आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 177 Teachers Of Kashmiri Pandit Community Transferred Out Of Kashmir Valley, Latest News And Update

वाढत्या 'टार्गेट किलिंग'मुळे केंद्राचा मोठा निर्णय:177 शिक्षकांची काश्मीर खोऱ्याबाहेर बदली; सर्वजण काश्मिरी पंडित

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू काश्मिरातील टार्गेट किलिंगच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काश्मिरी पंडित समुदायाच्या 177 शिक्षकांची खोऱ्याबाहेर बदली करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या सर्वांना काश्मीर जिल्हा मुख्यालयात पोस्टिंग देण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या शुक्रवारी झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

पंडितांचा संताप शांत करण्याचा प्रयत्न

श्रीनगरच्या मुख्य शिक्षणाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या एका निवेदनाद्वारे सर्वच शिक्षकांना बदलीची माहिती देण्यात आली आहे. प्रशासनाने या निर्णयाद्वारे टार्गेट किलिंगविरोधात संताप व्यक्त करणाऱ्या काश्मिरी पंडितांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. खोऱ्यात सातत्याने होणाऱ्या टार्गेट किलिंगमुळे या समुदायात मोठा आक्रोश पसरला आहे.

31 मे रोजी अतिरेक्यांनी रजनी बाला यांची घराबाहेर गोळी घालून हत्या केली होती.
31 मे रोजी अतिरेक्यांनी रजनी बाला यांची घराबाहेर गोळी घालून हत्या केली होती.

रजनी बालाच्या हत्येनंतर जम्मूत ट्रान्सफर करण्याची मागणी

काश्मिरी पंडित 31 मे रोजी सांबात रजनी बाला यांची हत्या झाल्यानंतर सातत्याने निदर्शने करत आहेत. टार्गेट किलिंगच्या घटना रोखण्यासाठी जम्मूत बदली करण्याची त्यांची मागणी आहे.

सुरक्षादलच सुरक्षित नाहीत, आम्हाला कोण सुरक्षा देईल?

अनंतनागच्या मट्टनमध्ये राहणारे काश्मिरी पंडित रंजन ज्योतिषी यांनी आता आपला संयम संपल्याचे स्पष्ट केले आहे. आमचे अनेक लोक मारले गेलेत. सरकारला आमच्याकडून काय हवे आहे? खोऱ्यात सुरक्षादलच सुरक्षित नाहीत, तर मग आम्ही कसे सुरक्षित राहणार. आमच्या संयमाचा बांध फुटला आहे, असे ते म्हणाले.

अनंतनागमध्ये राहणाऱ्या काश्मिरी पंडितांनी जम्मूत सुरक्षित जाण्यासाठी सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे.
अनंतनागमध्ये राहणाऱ्या काश्मिरी पंडितांनी जम्मूत सुरक्षित जाण्यासाठी सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे.

खोऱ्यात जवळपास 5900 कर्मचारी कार्यरत

खोऱ्यात पंतप्रधान पॅकेज व अनुसूचित जातीसारख्या प्रवर्गांतील जवळपास 5900 हिंदू कर्मचारी कार्यरत आहेत. यातील 1100 ट्रान्झिट कॅम्प, तर 4700 जण खासगी निवासस्थानांत राहतात. निर्बंधांनंतरही या कर्मचाऱ्यांपैकी जवळपास 80 टक्के कर्मचाऱ्यांनी खोऱ्यातून जम्मूत पोहोचलेत. अनंतनाग, बारामुल्ला, श्रीनगरच्या कॅम्पमधील अनेक कुटुंबांना पोलिस-प्रशासनाच्या पहाऱ्यामुळे बाहेर पडता येत नाहीये.

बातम्या आणखी आहेत...