आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 18+ Coronavirus Vaccine In India To Begin On May 1 But Politics On Availability Of Vaccine Doses In India Congress BJP Politics Over Vaccination

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लसीकरणाच्या डोसवर राजकारण:1 मे पासून सुरू होत आहे 18 वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण, पण काँग्रेसशासित 4 राज्यांमध्ये यामुळे होत आहे विरोध

21 दिवसांपूर्वीलेखक: रवींद्र भजनी
  • कॉपी लिंक
  • कोणत्या राज्यांजवळ किती डोस आहे

देशात 1 मेपासून 18 वर्षांवरील लोकांचे लसीकरणाची सुरुवात केली जाणार आहे. दरम्यान, देशातील काँग्रेसशासित 4 राज्य सरकार 18 वर्षांवरील लोकांचे लसीकरण करण्यास नकार देत आहे. कारण संबंधित राज्य सरकारांजवळ पुरवठा नसल्याचे बोलले जात आहे. यामध्ये झारखंड, पंजाब, छत्तीसगड आणि राजस्थान राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात राज्यातही कॉंग्रेस पक्ष आघाडी सरकारमध्ये सहभागी आहे, परंतु, या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन्य राज्यातील काँग्रेसप्रणीत मुख्यमंत्र्यांसमवेत उभे असल्याचे दिसून येत नाही आहे.

दरम्यान, या पत्रकार परिषदेत छत्तीसगड, राजस्थान, पंजाब आणि झारखंड (झारखंड मुक्ती मोर्चा-कॉंग्रेस सरकार) चे आरोग्यमंत्री म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकार राज्यांशी सावत्र आईशी वागत आहे. त्यांचे म्हणणे आहे की, लसीचा स्टॉक निर्मात्यांकडून केंद्र सरकारने हायजॅक केला आहे. अशा परिस्थितीत, १ मेपासून या राज्यातील 18 वर्षांवरील लोकांचे लसीकरण करणे कठीण जाणार आहे.

कोणत्या राज्यांजवळ किती डोस आहे

राज्यदिलेले डोसबाकी डोस
पंजाब29.25 लाख5.30 लाख
झारखंड29.65 लाख7.66 लाख
राजस्थान1.22 कोटी9.27 लाख
छत्तीसगड53.34 लाख​​​​​​​ 4.26 लाख

या राज्यांची अडचण काय?

  • राजस्थानचे आरोग्यमंत्री रघु शर्मा यांचे म्हणणे आहे की, सर्व प्रौढांना लसीकरण करण्याची मोहीम सुरू करण्यासाठी लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) कडे संपर्क साधला होता. परंतु, तेथून असे उत्तर आले की, 15 मेपूर्वी लस डोस उपलब्ध होणार नाही. शर्मा पुढे बोलताना म्हणाले की, आमच्याकडे क्षमता आहे. आमची डोस देण्याची तयारी आहे, परंतु डोस नाही.
  • कॉग्रेसच्या मंत्र्यांची अशी मागणी केली आहे की, केंद्र सरकारनेच 18 वर्षांवरील लोकाच्या लसीकरणाचा खर्च उचलायला हवा. परंतु, केंद्र सरकार यासाठी तयार नाही. केंद्राच्या मते, ते प्रथम उच्च-जोखीम असणार्‍या गटाला लसीकरण करावयाचे आहे, असे केंद्राचे म्हणणे आहे. म्हणजेच, 45+ लसीकरणानंतर, केंद्र सरकार इतर वयोगटांना या लसीकरणाच्या मोह‍िमेमध्ये समाविष्ट करण्याचा विचार करेल.
बातम्या आणखी आहेत...