आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी शेतात शनिवारी बोअरवेल खोदताना तब्बल 18 सोन्याची नाणी सापडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटना एडुवाडाला पालेम गावातील आहे.
हे शेत मनुकोंडा सत्यनारायण नावाच्या व्यक्तीचे आहे. शेतातील बोअरवेल पाइपलाइनच्या खोदकामात मातीच्या घागरीतून नाणी सापडली आहेत. सत्यनारायण यांना नाणी मिळताच त्यांनी याबाबत तहसीलदारांना माहिती दिली.
जिल्हाधिकाऱ्यांकडे नाणी सुपूर्द करण्यात येणार
तहसीलदार पी. नागमणी यांनी माहिती मिळताच शेतात पोहोचल्याचे सांगितले. ग्रामस्थांच्या उपस्थितीत शेतमालकाचा जबाब घेऊन मडक्यासह सोन्याची नाणी जप्त केली. सत्यनारायण यांच्या शेतातून 61 ग्रॅम वजनाची एकूण 18 सोन्याची नाणी सापडली आहेत. ही नाणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द करून तिजोरीत जमा करण्यात येणार आहेत. तसेच त्याची माहिती पुरातत्व विभागाला देण्यात आली आहे.
तुमच्या जमीनीत सोनं सापडलं तर तुमचा वाटा किती? जाणून घ्या कायदा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रात दोन ठिकाणी सोन्याच्या खाणी असल्याचे विधान केल्यानंतर राज्यात एकच चर्चा सुरु झाली आहे. एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, चंद्रपूर आणि सिंधुदुर्गमध्ये सोन्याच्या खाणींबद्दलची माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांनी मला दिली. आमच्या काळात हे सोने निघाले तर ती राज्यासाठी खूप मोठी उपलब्धी असेल, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या विधानानंतर महाराष्ट्रातील सोन्याच्या साठ्यांविषयी एकच चर्चा सुरु आहे. महाराष्ट्राच्या जमीनीत सोन्यासह इतर खनिजांचेही साठे आहेत. यापैकी बहुतेक साठे हे विदर्भात आहेत. या पार्श्वभूमीवर जर एखाद्या जमीन मालकाच्या जमीनीत सोने किंवा इतर मौल्यवान खनिजाचा साठा सापडला तर त्याला याचा कितपत फायदा होऊ शकतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न दिव्य मराठीने केला. आपल्या जमीनीत जर असा खनिजसाठा सापडला तर आपल्याला त्यात किती वाटा मिळेल असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. तुमच्या याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आम्ही या बातमीत केला आहे. संपूर्ण बातमी वाचा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.