आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आइस्क्रीमवरही लागणार जीएसटी:पार्लरमध्ये विकल्या जाणाऱ्या आइस्क्रीमवर 18 % जीएसटी

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पार्लर किंवा अशाच पद्धतीच्या आऊटलेटमध्ये विकणाऱ्या आइस्क्रीमवर आता १८% जीएसटी आकारला जाणार आहे. यासोबतच वाढवण्यात आलेल्या या वेगळ्या करावर आता आइस्क्रीम पार्लरला इनपुट क्रेडिटही (आयटीसी) मिळेल. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क (सीबीआयसी) विभागाने विविध वस्तू आणि कर दायित्वाबाबत हे स्पष्ट केले आहे. आधी आइस्क्रीमवर ५% जीएसटी होता, मात्र इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नव्हता. आता आयटीसी मिळेल. परिपत्रकानुसार, पुस्तकाच्या रूपात प्रकाशित स्मरणिकेत जाहिरातीसाठी जागा विकल्यास ५% सवलत दराने जीएसटी लागू होईल. हॉटेल, टूर अँड ट्रॅव्हल ऑपरेटर्सद्वारे वसूल केलेल्या कॅन्सलेशन चार्जेसवर त्याच दराने जीएसटी लागेल जो मूळ सेवेवर लागू आहे.

प्रवेशासाठी संभाव्य विद्यार्थ्यांची शुल्क घेणे किंवा पात्रता प्रमाणपत्र जारी करणे आणि नेपाळ-भूतानसाठी कार्गो ट्रान्झिटशी संबंधित सेवांसाठी घेतल्या जाणाऱ्या शुल्कात जीएसटी सवलत दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...