आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मू-काश्मीरला येणाऱ्या पर्यटकांचा मार्ग आणखी सोपा होणार आहे. सरकारने येथे सुमारे पाच हजार कोटी रुपये खर्चाच्या १८ नवीन रोपवेसाठी स्थळांची निश्चिती केली आहे. नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लििमटेडसोबत सरकारने एमओयू केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बालटालहून अमरनाथ गुहेसाठी प्रस्तावित ९ किमीचा रोपवे होणार आहे. यासाठी १४ किमीचे पायी अंतर १० तासांवरून केवळ ४० मिनिटांवर येईल. तिन्ही रोपवे पुढील वर्षी पूर्ण होण्याची शक्यता आहे. यात वैष्णोदेवी फेज-२ (२.४ किमी), शिवखोरी श्राइन (२.१ किमी) आणि श्रीनगरला शंकराचार्य डोंगर (१ किमी) रोपवेचा समावेश आहे.
सध्या जम्मू-काश्मिरात ५ रोपवे सुरू
- रोपवे जम्मू-काश्मीरसारख्या डोंगरी राज्यात पर्यावरणपूरक माध्यम आहे. झाडांची कत्तलही नाही.
- रस्त्यासाठी जमीन अधिग्रहण करावी लागत नाही. कन्स्ट्रक्शन आणि मेंटेनन्स खर्चही कमी.
- सध्या ५ रोपवे सुरू आहेत. यात वैष्णोदेवी, जम्मू शहर, पटनीटॉप, गुलमर्ग आणि श्रीनगरचा समावेश.
गुलमर्ग : विक्रमी १०० कोटी कमावले
जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेले सर्व रोपवे प्रकल्प नफ्यात आहेत. गुलमर्गमधील प्रसिद्ध गंडोला रोपवेने मागील वर्षी विक्रमी १०० कोटी रुपयांची कमाई केली. सुमारे आठ लाख पर्यटकांनी रोपवेमध्ये प्रवास केला. आता पहलगाम आणि सोनमर्गमध्ये रोपवे प्रस्तावित आहे. दाने किमी लांब पहलगाम प्रकल्पाचा सर्व्हे पूर्ण झाला आहे.
२५० कोटी खर्च येणार
वैष्णोदेवीसाठी फेज-२ मधील तारकोट मार्ग ते सांझी छट या बहुप्रतीक्षित रोपवेसाठी २५० कोटी रु. खर्च येईल. निविदा शेवटच्या टप्प्यात आहे. लवकर काम सुरू होण्याची शक्यता. रोपवे सुरू झाल्यावर भाविक अवघ्या ६ मिनिटांत मंदिर परिसरात पोहोचतील. आता ताराकोर्टहून सांझीला पायी जाताना ६ तास लागतात.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.