आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 18 Opposition Presidents Should Not Sign The Bill ... Farmers Curfew In 3 States Including Punjab On September 25

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कृषी विधेयकास विरोध:18 विरोधी पक्षांचे राष्ट्रपतींना साकडे, विधेयकावर स्वाक्षरी करू नका...पंजाबसह 3 राज्यांत 25 सप्टेंबर राेजी शेतकरी कर्फ्यू

नवी दिल्ली/जयपूर/चंदीगड8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
निलंबित सदस्य अनिश्चित काळासाठी संसद परिसरात धरणे आंदोलनास बसले. रात्री त्यांच्यासाठी चादरी, उशा आणि पंख्यांचीही व्यवस्था करण्यात आली होती. - Divya Marathi
निलंबित सदस्य अनिश्चित काळासाठी संसद परिसरात धरणे आंदोलनास बसले. रात्री त्यांच्यासाठी चादरी, उशा आणि पंख्यांचीही व्यवस्था करण्यात आली होती.
  • निलंबनानंतर खासदारांचे संसदेत धरणे, रात्रभर ठिय्या

कृषी विधेयकांवर राज्यसभेत रविवारी झालेल्या गदारोळावर सभापती व्यंकय्या नायडूंनी सोमवारी ८ विरोधी खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित केले. त्यात तृणमूलचे डेरेक ओ’ब्रायन आणि डोला सेन, काँग्रेसचे राजीव सातव, रिपुन बोरा आणि सैयद नजीर हुसैन, आपचे संजय सिंह, माकपचे के.के. रागेश आणि इलामारन करीम आहेत. निलंबनानंतरही हे सदस्य बाहेर गेेले नाहीत, उलट विरोधी पक्षांचे आणखी खासदार त्यांच्यासोबत निदर्शने करू लागले. त्यामुळे सभागृह स्थगित करण्यात आले. दुसरीकडे, काँग्रेससह १८ विरोधी पक्षांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून कृषी विधेयकांवर स्वाक्षरी न करण्याची विनंती केली. दरम्यान, देशात या विधेयकांविरुद्ध जोरदार निदर्शने झाली. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांनी २५ सप्टेंबरला शेतकरी कर्फ्यूचे आवाहन केले. राजस्थानचे शेतकरी त्याबाबतचा निर्णय २३ सप्टेंबरला घेतील.मात्र राज्यात विरोध म्हणून सोमवारी सर्व २४७ कृषी बाजार बंद ठेवण्यात आले.

> मंगळवारी कृषीशी संबंधित तिसरे विधेयक आवश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक राज्यसभेत सादर होईल. भाजपने आपल्या सदस्यांसाठी व्हिप काढला.

उपसभापतींविरुद्ध विराेधकांचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला

सभापती व्यंकय्या नायडू म्हणाले की, उपसभापतींना शारीरिक रूपात धमकी देण्यात आली. मार्शल वेळीच आले नसते तर परिस्थिती वाईट झाली असती. उपसभापतींविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळताना ते म्हणाले की, तो योग्य प्रारूपात नाही आणि १४ दिवसांची नोटीसही देण्यात आली नाही.

> प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ही हुकूमशाही आहे.

> काँग्रेसचे खासदार अहमद पटेल म्हणाले की, सरकार ताकदीचा वापर ८ खासदारांच्या निलंबनासाठी करत आहे.

बातम्या आणखी आहेत...