आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासरकारी नाेकरी मिळावी यासाठी देशातील काेट्यवधी तरुण अनेक वर्षे जिवाचे रान करून परीक्षेपर्यंत पाेहाेचतात खरे, परंतु तपस्येचे फळ म्हणून त्यांना मिळताे पेपरफुटीचा दंश. पेपरफुटी हाेत नसलेले देशात क्वचितच एखादे राज्य असावे. बहुतांश राज्यांत ही कीड दिसते. केवळ चार राज्यांतील आकडे पाहिले तरी भयावह चित्र समाेर येते. राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशात ५ वर्षांत (२०१७-२०२२) सरकारी भरती परीक्षांचे १८ पेपर लीक झाले आहेत. त्यामुळे या परीक्षांना बसलेल्या सुमारे सव्वा काेटी परीक्षार्थींचे भवितव्य अंधारात गेले. या प्रकरणात ४०० हून जास्त जणांना अटक झाली, परंतु त्यापैकी ९० टक्के बाहेर आहेत. पेपर लीक करणारे म्हाेरके फरार आहेत.
मप्र, बिहारसह ४ राज्यांत १० लाख पदे रिक्त : एकीकडे काेट्यवधी तरुण पेपर लीक झाल्यामुळे नाेकरीपासून वंचित झाले आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थानात १० लाखांवर सरकारी जागा रिक्त आहेत. त्यातही बिहारमध्ये सर्वाधिक ३.५० लाख, यूपीत ३.२५ लाख, राजस्थान-१.७५ लाख, मप्र-१.५ लाख पदे रिक्त आहेत. राजस्थानात बेराेजगारी दरही २८ टक्क्यांहून जास्त आहे.
18 भरती परीक्षा...पेपर लीकची सर्वाधिक प्रकरणे उत्तर प्रदेश {पोलिस भरती 2017 {यूपीटीईटी 21 {ट्यूबवेल ऑपरेटर-18 {यूपीपीसीएल 18 {सबॉर्डिनेट 2018 राजस्थान {काॅन्स्टेबल भरती 2018 {ग्रंथपाल भरती 18 {जेईएन सिव्हिल पदवीधारक भरती 18 {रीट लेव्हल 2 परीक्षा 21 {कॉन्स्टेबल भरती 22 {वनरक्षक भरती परीक्षा 20 {वरिष्ठ अध्यापक भरती परीक्षा 2022 {हायकोर्ट एलडीसी परीक्षा 22 बिहार {बिहार कर्मचारी निवड आयोगाची परीक्षा 2017 {बिहार कर्मचारी निवड आयोगाची इंटरस्तरीय परीक्षा 2017 {67वी बीपीएससी प्रारंभिक परीक्षा 2022 मध्य प्रदेश {नर्स भरती परीक्षा 2023, {प्राथमिक शिक्षक पात्रता परीक्षा 2022 ३ मोठ्या परीक्षा : यूपी टीईटी (21 लाख उमेदवार), रीट लेव्हल 2 (12.67 लाख) काॅन्स्टेबल,राजस्थान-12 लाख परीक्षार्थी.
हे ५ माेठे म्हाेरके.. पैकी ४, तुरुंगातून एक जण फरार भजनलाल बिश्नाेई, रामकृपाल मीणा, रीट लेव्हल २ पेपर लीकचा मास्टरमाइंड अटकेत. रामकृपालने शिक्षण संकुलातील स्ट्राँगरूममधून पेपर लीक करून भजनलाल बिश्नाेईला दिला हाेता. त्याने पुढे परीक्षार्थींना विकला हाेता. भूपेंद्र सारण : राजस्थान येथे २०२२ मध्ये सेकंड ग्रेड शिक्षक भरती परीक्षेत पेपर लीक करणारा मास्टरमाइंड अटकेत आहे. दुसरा सुरेश राणा फरार. सय्यद सादिक : उत्तराखंड एसएसएससी पेपर लीकचा मास्टरमाइंड अटकेत. रॅकेट हेही चालवतात : देशातील अनेक राज्यांत रॅकेट चालवणाऱ्या माफियांची बिहारमध्ये यादीच आहे. त्यात भास्कर चाैधरी, अतुल वत्स, उज्ज्वल कश्यप, बिजेंद्र गुप्ता, अखिलेशचा समावेश. {यूपीत शिक्षणमाफिया अमित िसंहला लखनऊमधून अटक झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.