आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 18 Tourists Drown After Double decker Boat Capsizes In Kerala's Malappuram, 10 Rescued

दुर्दैवी घटना:केरळच्या मलप्पुरममध्ये डबल डेकर बोट उलटून 21 पर्यटकांचा बुडून मृत्यू, 10 जणांना वाचवण्यात यश

मलप्पुरम22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात रविवारी पर्यटकांची बोट उलटून 21 जणांचा मृत्यू झाला. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, बोटीत 40 हून अधिक लोक होते. केरळचे क्रीडा मंत्री व्ही अब्दुररहमान यांनी वेगवेगळ्या रुग्णालयांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे 20 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की मृतांमध्ये बहुतेक मुले आणि महिला आहेत. 4 जणांना गंभीर अवस्थेत कोट्टाक्कल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या बोटीवर सुमारे 40 पर्यटक होते. तनूरजवळ ही दुर्घटना घडली. केरळचे मंत्री व्ही. अब्दुररहमान यांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास थूवल थेरम टूरिस्ट स्पॉटवर पुरपुझा नदीत ही दुर्घटना झाली. बचावकार्य सुरू आहे. बोटीवर असलेले पर्यटक मलप्पुरम जिल्ह्यातील परप्पनंगडी आणि तनूर भागातीलच होते. येथे बोट चालकांना सायंकाळी ५ वाजेपर्यंतच बोट चालवण्याची परवानगी आहे.

पाहा या अपघाताची 7 छायाचित्रे...

मलप्पुरम जिल्ह्यातील तनूर भागात रविवारी संध्याकाळी ७ वाजता उलटलेल्या पर्यटक बोटीला वाचवण्यासाठी स्थानिक लोक पाण्यात उतरले.
मलप्पुरम जिल्ह्यातील तनूर भागात रविवारी संध्याकाळी ७ वाजता उलटलेल्या पर्यटक बोटीला वाचवण्यासाठी स्थानिक लोक पाण्यात उतरले.
लोकांनी दोरी बांधून बोट सरळ करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून ती किनाऱ्यावर आणता येईल. एनडीआरएफच्या टीमच्या नेतृत्वाखाली बचावकार्य सुरू झाले.
लोकांनी दोरी बांधून बोट सरळ करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून ती किनाऱ्यावर आणता येईल. एनडीआरएफच्या टीमच्या नेतृत्वाखाली बचावकार्य सुरू झाले.
बोटीला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला. यावेळी बचाव पथकाने २१ जणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.
बोटीला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला. यावेळी बचाव पथकाने २१ जणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.
घटनास्थळी मोठ्या संख्येने रुग्णवाहिका पोहोचल्या, त्यांच्या मदतीने जखमी आणि मृतांना रुग्णालयात आणण्यात आले.
घटनास्थळी मोठ्या संख्येने रुग्णवाहिका पोहोचल्या, त्यांच्या मदतीने जखमी आणि मृतांना रुग्णालयात आणण्यात आले.
रुग्णालयाबाहेर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या अपघातासाठी लोक बोट चालकांना जबाबदार धरत आहेत.
रुग्णालयाबाहेर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या अपघातासाठी लोक बोट चालकांना जबाबदार धरत आहेत.
परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केरळमधील स्थानिक नेते रुग्णालयात पोहोचले. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.
परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केरळमधील स्थानिक नेते रुग्णालयात पोहोचले. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.
क्रेनच्या सहाय्याने बोट किनाऱ्यावर आणण्यात आली आहे. बचावकार्य अजूनही सुरू आहे.
क्रेनच्या सहाय्याने बोट किनाऱ्यावर आणण्यात आली आहे. बचावकार्य अजूनही सुरू आहे.

पीएम मोदींनी 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट केले- केरळमधील मलप्पुरम येथे झालेल्या बोट दुर्घटनेत लोकांचा मृत्यू झाल्याने मी दु:खी आहे. मृतांच्या कुटुंबियांना माझ्या संवेदना. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाख रुपये दिले जातील.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखर आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनीही मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे.