आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना:देशभरात 1.83 लाख सक्रिय,1.15 लाख महाराष्ट्र-केरळात, पॉझिटिव्हिटी रेट 5.6 टक्के

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवे स्वरूप जास्त धोकादायक : ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन

अमेरिका व युरोपातील वाढत्या संसर्गादरम्यान देशात आता कोरोना विषाणूची गती मंदावत चालली आहे. शनिवारी देशात एकूण सक्रिय रुग्ण केवळ १ लाख ८२ हजार ८३३ होते. त्यापैकी १ लाख १५ हजार ३२३ रुग्ण केवळ केरळ व महाराष्ट्रात आहेत. म्हणजेच एकूण रुग्णांचे प्रमाण सुमारे ६३ टक्के आहे. तेही केवळ दोन राज्यांत. उर्वरित सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशात मिळून ६७,५१० सक्रिय रुग्ण आहेत. देशात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत सध्या ५.६ टक्के आहे. दररोज होणाऱ्या तपासणीत १०० पैकी ५ ते ६ लोक बाधित आढळून येत आहेत. परंतु महाराष्ट्र, गोव्यात पॉझिटिव्हिटी रेट १२ टक्क्यांहून जास्त आहे. महाराष्ट्रात १०० पैकी १४, तर गोव्यात १२ लोक बाधित आहेत. पॉझिटिव्हिटी रेटमध्ये चंदीगड तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथे १०० पैकी १० लोक बाधित आढळले. १४ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत हा दर राष्ट्रीय सरासरीहून जास्त आहे. देशात शनिवारपर्यंत एकूण बाधितांची संख्या १.०६ कोटींवर व १.०३ कोटी रुग्ण बरे झाले.

पाकची विनंती मिळाली नाही
भारत सरकार सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, मोरोक्को, बांगलादेश तसेच म्यानमारला करारानुसार कोरोना लस उपलब्ध करून देत आहे. आतापर्यंत भूतान, मालदीव, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार, सेशेल्सला लसीच्या खेपा पाठवण्यात आल्या आहेत. पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तानला आतापर्यंत लस पाठवलेली नाही. कारण त्यांच्याकडून तशी विनंती करण्यात आलेली नाही, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी दिली. दुसरीकडे फ्रान्समध्ये बाधितांची संख्या शुक्रवारी रात्री ३० लाखांवर पोहोचली आहे. राष्ट्रीय आरोग्यविषयक संस्थेच्या म्हणण्यानुसार महामारी सुरू झाल्यापासून आतापर्यंत ३० लाख ११ हजार लोक बाधित झाले.

नवे स्वरूप जास्त धोकादायक : जॉन्सन
ब्रिटनमध्ये मिळालेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबाबत ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पहिल्यांदाच राष्ट्राला उद्देशून भाषण केेले. देशात आढळून आलेला स्ट्रेन जास्त धोकादायक आहे. कदाचित त्यामुळे मृत्युसंख्या वाढू शकते. नवीन विषाणू वेगाने पसरतो, अशी माहिती मिळाली आहे. लंडनमध्ये सर्वात आधी हा विषाणू आढळून आला होता. कदाचित त्यामुळे मृत्यू वाढले असावेत. डॉक्टर पॅट्रिक वॉलेस यांनीदेखील जॉन्सन यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. संशोधन विभागाचे माजी सल्लागार आहेत. आपल्यासमोर डेटा आहे.

हाँगकाँगमध्ये पहिल्यांदाच लॉकडाऊन लागू झाले
हाँगकाँगमध्ये पहिल्यांदाचलॉकडाऊन लागूहाँगकाँगमध्ये कोरोना विषाणू पसरण्याचा वेग वाढत असल्याने पहिल्यांदाच एखाद्या शहरात लॉकडाऊन लागू झाला आहे. घनदाट वस्ती असलेल्या शहरात ४८ तासांसाठी लॉकडाऊन लागू झाला आहे. सुमारे १० हजार रहिवाशांना याचा फटका बसला आहे. त्यासाठी ३ हजार कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. या भागात सर्व लोकांची तपासणी केली जाणार आहे. येथे गरीब व घनदाट वस्ती आहे. चीनमध्ये कोरोना पसरल्यानंतर हाँगकाँगने दक्षता बाळगली होती. आता मात्र प्रशासनाने आणखी खबरदारी घेतली आहे.

बातम्या आणखी आहेत...