आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 19 Thousand Squads Will Screen About 2.5 Crore People, Information Will Be Recorded In Tabs In Hariyana

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हरियाणा:अडीच कोटी लोकांची स्क्रीनिंग करणार 19 हजार पथके, टॅबमध्ये नोंद होणार माहिती

चंदिगडएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • डेटा जमा करण्यासाठी नवे अॅप, 30 हजार कर्मचारी मैदानात उतरणार

मनोजकुमार

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हरियाणा सरकार राज्यातील अडीच कोटी लोकांचे स्क्रीनिंग करणार आहे. भिलवाडा मॉडेलप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या स्क्रीनिंगसाठी राज्यात १९,६६३ पथके बनवली आहेत. यात ३० हजारांहून अधिक कर्मचारी सहभागी आहेत. 

सामान्य स्थितीच्या जिल्ह्यांत आशा, एएनएम आणि अंगणवाडी सेविकांची पथके स्क्रीनिंग करतील. कंटेनमेंट झोनमधील जिल्ह्यांत या पथकांसह पोलिस, डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकांच्या स्क्रीनिंगचा डेटा नोंदीसाठी एक अॅप विकसित करण्यात आले आहे. आशा सेविका टॅबवर प्रत्येक व्यक्तीची माहिती नोंद करेल. एखाद्यात कोरोनाची लक्षणे दिसल्यास ती माहिती तत्काळ आरोग्य विभागाला दिली जाईल. त्या व्यक्तीला तत्का‌ळ रुग्णालयात दाखल करून कोरोना चाचणीसाठी नमुने घेतले जातील. विशेष म्हणजे हरियाणात २२७ कोरोना रुग्ण आहेत. आरोग्यमंत्री अनिल विज म्हणाले की, राज्यात पथकांचे काम सुरू झाले आहे. एका आठवड्यात काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.  

घरातून केव्हा बाहेर पडले हेही विचारणार 

स्क्रीनिंगवेळी कुटुंबातील प्रत्येकाची पूर्ण माहिती घेतली जाईल. त्यांचा प्रवास इतिहासासह ते केव्हा बाहेर गेले, कोठे गेले होते हेही विचारले जाईल. रुग्णालयात गेले होते का, आजार आहे का, खोकला-सर्दी असेल तर केव्हापासून आहे, गेल्या काही दिवसांत संपर्कात कोण आले आदी माहिती घेतली जाईल. 

बातम्या आणखी आहेत...