आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 19 Vaccinations India Update : Vaccines Free At Government Hospitals, Paid At Private Hospital

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जनतेला लाभ:सरकारी रुग्णालयांत लस मोफत, खासगीत सशुल्क; 1 मार्चपासून 'या' नागरिकांचे केले जाणार लसीकरण

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2 दिवसांत लसीची किंमत ठरवली जाईल

देशात १ मार्चपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठांचे लसीकरण सुरू होत आहे. ४५ वर्षांवरील गंभीर आजारांनी ग्रस्त लोकांनाही लस मिळणार आहे. आधी ५० वर्षांवरील गंभीर रुग्णांना लस देण्याची चर्चा हाेती. तसेच खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांवरही लस दिली जाईल. सध्या आरोग्य आणि फ्रंटलाइन वर्कर्सनाच लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयांत मोफत लस मिळणार आहे. खासगी रुग्णालयांत त्याची किंमत किती आणि गंभीर अाजार कोणते यावर सरकार पुढील २-३ दिवसांत निर्णय घेणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. सर्वसामान्यांचे लसीकरण सुरू होण्याआधी कोविन अॅपही अपडेट होत आहे. अॅपमध्ये लसीकरणाची माहिती, प्रमाणपत्रेही डाऊनलोड करता येईल.

देशात तिसऱ्या लसीची तयारीही सुरू आहे. डॉ. रेड्डीज लॅब रशियाच्या स्पुटनिक लसीची चाचणी करत आहे. कंपनीने तिच्या आपत्कालीन वापराची परवानगी मागितली होती. बुधवारी सीडीएससीओच्या तज्ज्ञ समितीने लसीचा अतिरिक्त डेटा सादर करण्यास सांगितले आहे.

हृदय, किडनी रोगासारख्या आजारांचा गंभीर श्रेणीत समावेश होऊ शकतो
केंद्र सरकारकडून कोविन अॅप सामान्य लोकांसाठी २७-२८ फेब्रुवारीपर्यंत सुरू केले जाऊ शकते. सध्या ते अपडेट करण्याचे काम सुरू आहे. गंभीर आजारांत लिव्हर सोरायसिस, क्रॉनिक किडनी डिसीज, मधुमेह, हृदयाशी संबंधित आजार, रोग प्रतिबंधक क्षमता कमी असेल तर, न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डरसह इतर आजारांचा समावेश केला जाऊ शकतो.

ऑपरेशनल आणि सर्व्हिस चार्ज घेऊ शकतील, किती ते केंद्र सरकार ठरवेल
सूत्रांनुसार, खासगी रुग्णालयांना कंपन्यांकडून थेट लस खरेदीची परवानगी नसेल. केंद्रच त्यांना लस देईल. सरकार त्यांनाही मोफत लस देण्याची शक्यता आहे. लस देण्यासाठीची ऑपरेशनल कॉस्ट आणि सर्व्हिस चार्ज लाभार्थींकडून घ्यावा, असे खासगी रुग्णालयांना सांगितले जाऊ शकते. ते किती घ्यावे याची एक ठराविक रक्कम केंद्र सरकार निश्चित करू शकते.

सर्वांना मोफत लस द्यायचीय, केंद्राने मदत करावी : ममता
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, राज्यात निवडणुकीआधी सर्वांचे मोफत लसीकरण व्हायला हवे. राज्य सरकार मोठ्या प्रमाणात स्वतंत्रपणे लस खरेदी करू इच्छिते. त्यासाठी केंद्राने आम्हाला मदत करावी.

बातम्या आणखी आहेत...