आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात गेल्या 24 तासात 1913 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 6 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या देशातील विविध भागात 16 हजार 261 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी 2 हजार 841 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. देशात कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 5.24 लाख जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
देशात सर्वाधिक 673 रुग्ण दिल्लीत सापडले आहे, तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासातील ही सर्वाधिक मृत्यूंची संख्या आहे. दिल्लीचा पॉझिटिव्ह रेट सध्या 4.97 टक्के आहे.
दिल्लीपाठोपाठ या राज्यात सर्वाधिक रुग्ण
शनिवारी हरियाणात कोरोनाचे 343 रुग्ण सापडले होते. त्यामुळे तेथील कोरोनाग्रस्तांचा आकडा 99 लाखांपेक्षा जास्त झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ही 10,621 इतकी झाली आहे. सध्या तेथील पॉझिटिव्हीटी रेट हा 2.36 टक्के इतका आहे.
तर महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 248 रुग्णांची नोंद करण्यात आली. तर एकाचा मृत्यू झाला. सध्या राज्यात 1439 सक्रिय रुग्ण असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 78 लाखांचा पार गेला आहे. शनिवारी 28032 कोरोना चाचणी करण्यात आली.
आफ्रिकेत कोरोनामुळे 2 लाखांहून अधिक मृत्यू
आफ्रिका सीडीसीने सांगितले की, देशात कोविड-19 ची 1.15 कोटींहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आतापर्यंत, संपूर्ण खंडात कोरोनामुळे 252,626 जणांचा मृत्यू झाले आहेत आणि 1.08 कोटी लोक बरे झाले आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार, दक्षिण आफ्रिका, मोरोक्को, ट्युनिशिया आणि इजिप्त, महाद्वीप हे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेले देश आहेत. मध्य आफ्रिका सर्वात कमी कोरोना प्रभावित क्षेत्र आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.