आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीच्या वादग्रस्त मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ED अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने 2 आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांत अरविंदो फार्माचे चीफ शरद रेड्डी व विनय बाबू यांचा समावेश आहे. हे दोघेही हैदराबादच्या टॉप फार्मा कंपनीचे संचालक आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी सीबीआयने आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते व एका मीडिया कंपनीचे माजी सीईओ विजय नायर, हैदराबादचे व्यावसायिक अभिषेक बोइनपल्ली यांना अटक केली होती.
17 ऑगस्ट रोजी CBIने 3 जणांविरोधात दाखल केला होता गुन्हा
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने 17 ऑगस्ट रोजी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. यात बड्डी रिटेल प्रायव्हेट लिमिटेड ग्ररुग्रामचे संचालक अमित अरोरा, दिनेश अरोरा व अर्जुन पांडे यांच्या नावांचा समावेश होता. हे सर्वजण सिसोदियांचे निकटवर्तीय असल्याचे मानले जाते. सीबीआयच्या माहितीनुसार, राधा इंडस्ट्रीजचे संचालक दिनेश अरोरा यांनी इंडोस्पिरिट्सचे समीर महेंदु यांच्याकडून 1 कोटींची रकम घेतली होती. या प्रकरणी उद्योगपती दिनेश अरोरा यांना सरकारी साक्षीदार करण्यात आले आहे.
सर्वप्रथम विजय नायर यांना अटक
सीबीआयने महिन्याभरापूर्वी दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी आरोपी विजय नायर यांना अटक केली होती. ते एका एंटरटेनमेंट व इव्हेंट मीडिया कंपनीचे माजी सीईओ आहे. तत्पूर्वी ईडीने त्यांच्या विविध ठिकाणांवरही छापेमारी केली होती. विजय या कथित घोटाळ्याचा मुख्य मास्टरमाइंड असल्याचे सांगितले जात आहे. विजय नायर हा दिल्लीचे उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा निकटवर्तीय आहे.
केजरीवाल सरकारने नोव्हेंबर 2021 मध्ये लागू केले होते नवे मद्य धोरण
दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टीने 2020 मध्ये नवे मद्य धोरण लागू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार मे 2020 मध्ये सरकारने नवे मद्य धोरण सादर केले. त्याची नोव्हेंबर 2021 पासून अंमलबजावणी सुरू केली. सरकारने हे धोरण लागू करण्यासाठी 4 प्रमुख तर्क दिले होते...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.