आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यसभेत कृषीसंबंधीत 2 विधेयक पास:वोटिंगदरम्यान वेलमध्ये विरोधी पक्षाची घोषणाबाजी, टीएमसी खासदार ओ ब्रायन यांनी सभागृहाचे नियम पुस्तक फाडले, म्हणाले- संसदेचा प्रत्येक नियम मोडला गेला

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत सदनाची कार्यवाही स्थगित, अनेक विरोधी पक्षांनी जोरदार घोषणाबाजी करत गदारोळ केला
  • राहुल गांधींनी ट्विट करत म्हटले - मोदीजी शेतकऱ्यांना गुलाम बनवत आहेत

राज्यसभेत केंद्र सरकारने शेतीसंबंधीत दोन बिल फार्म अँड प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स (प्रमोशन अँड फॅसिलिटेशन) बिल आणि फार्मर्स (एम्पावरमेंट अँड प्रोडक्शन) अॅग्रीमेंट ऑन प्राइस एश्योरेंस अँड फार्म सर्व्हिस बिल ध्वनी मताने मंजूर केले आहे.

वोटिंगदरम्यान सदनात मोठा गदारोळ झाला. विरोधी खासदारांनी वेलमध्ये जाऊन घोषणाबाजी केली. तृणूलचे खासदार डेरेक ओ’ब्रायन यांनी उपसभापति हरिवंश यांचा माइक तोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सभागृहाचे नियम पुस्तक फाडले. सभागृहाची कार्यवाही सुरू ठेवण्यासाठी मार्शलला बोलवावे लागले. दहा मिनिटांसाठी सभा तहकूब झाल्यानंतर पुन्हा मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आणि गदारोळात सरकारने दोन्ही बिले मंजूर केली.

कृषिमंत्री म्हणाले, शेतकर्‍यांचे आयुष्य बदलेल

तत्पूर्वी कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर म्हणाले की, दोन्ही बिले ऐतिहासिक आहेत, ते शेतकर्‍यांचे जीवन बदलतील. शेतकरी देशभर कुठेही धान्य विकायला सक्षम होतील. मी त्यांना खात्री देतो की बिले किमान समर्थन दराशी (एमएसपी) संबंधित नाहीत.

कॉंग्रेसचा निषेध, राहुल म्हणाले- मोदी जी शेतकर्‍यांना गुलाम बनवत आहेत
कॉंग्रेसने विधेयकाचा कडाडून विरोध करण्यास सुरवात केली आहे. कॉंग्रेसचे खासदार प्रतापसिंह बाजवा म्हणाले की, ते आणि त्यांचा पक्ष शेतकऱ्यांच्या मृत्यू वॉरंटवर सही करणार नाहीत. राहुल गांधींनी देखील ट्विट करत सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, मोदी जी शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवत आहेत. देश हे कधीही यशस्वी होऊ देणार नाही.

बातम्या आणखी आहेत...