आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Violence In 2 Cities Of Uttar Pradesh On Independence Day, Latest News And Update

स्वातंत्र्य दिनी UPच्या 2 शहरांत हिंसाचार:​​​​​​​लखनऊच्या बंगला बाजारात तिरंगा यात्रेवर दगडफेक, प्रयागराजमध्ये तरुणावर गोळीबार

लखनऊ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवघा भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना उत्तर प्रदेशच्या लखनऊ व प्रयागराज या 2 शहरांत हिंसाचार झाला आहे. लखनऊच्या बंगला बाजार भागात काही जण तिरंगा यात्रा काढत होते. त्यावेळी त्यांचा दुसऱ्या गटाशी वाद झाला. यावेळी झालेली शाब्दिक चकमकीचे नंतर मारहाण व दगडफेकीत झाले.

प्रयागराजमध्ये तिरंगा यात्रेत डीजे वाजवणाऱ्या तरुणाला गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला. ही घटना घूरपूर पोलिस ठाणे हद्दीतील घूरपूर गावची आहे. तरुणाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे.

हा फोटो लखनऊच्या बंगला बाजारचा आहे. त्यात तरूण दगडफेक करताना दिसून येत आहेत.

लखनऊमध्ये स्वातंत्र्य सोहळ्याच्या निमित्ताने तिरंगा यात्रा काढली जात होती. त्यात आशियानाच्या बंगला बाजार भागातील चंद्रिका देवी मंदिराच्या समोर 2 गट एकमेकांसमोर आले. यावेळी झालेल्या दगडफेकीत दुकाने व घरांचे मोठे नुकसान झाले. या घटनेचे अनेक व्हिडिओ उजेडात आलेत. अनेक वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे.

एकाच समुदायाच्या तरुणांत जुना वाद

पोलिसांनी ही घटना जुन्या वादातून घडल्याचा दावा केला आहे. दोन्ही गटांत जुना वाद आहे. तिरंगा यात्रेमुळे हे गट पुन्हा एकमेकांपुढे आले. वाद सुरू करणारा हिस्ट्रीशीटर आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले. स्थिती नियंत्रणात आहे, असे पोलिस म्हणाले.

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणली. घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आहे.

या प्रकरणी अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर 9 जणांसह 14 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य आरोपींच्या शोधार्थ पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे.

दुकाने व घरांवर दगडफेक करण्यात आली. त्यात अनेक वाहनांचे नुकसान झाले.

किरकोळ कारणांवरुन गोळीबार

प्रयागराजमध्ये तिरंगा यात्रा काढताना किरकोळ कारणावरून डीजे चालक व तिरंगा यात्रेत सहभागी 2 तरुणांत वाद झाला. त्यानंतर एका तरुणाने कंबरेचा गावठी कट्टा काढून डीजे वाजवणाऱ्या तरुणाला गोळी घातली. त्यात हा तरुण गंभीर जखमी झाला.

प्रयागराजमध्ये तिरंगा यात्रेत डीजे वाजवणाऱ्या तरुणावर गोळीबार करण्यात आल्यानंतर स्थिती तणावपूर्ण बनली.

पीडित तरुण मनोज कुमार पटेल ग्लास फॅक्ट्री भागात राहतो. त्याला गंभीर स्थितीत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या

आरोपी नीरज कुमार निषाद याच्या पोलिसांनी घटनास्थळावरूनच मुसक्या आवळल्या आहेत. तिरंगा यात्रेत सहभागी तरुणांनी सांगितले की, नीरज याने 315 बोअर पिस्तूलातून मनोजला गोळ्या घातल्या.

एसपी म्हणाले -पीडिताच्या तक्रारीची प्रतीक्षा

एसपी जमुनापार सौरभ दीक्षित यांनी सांगितले की, पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. पीडित पक्षाकडून औपचारिक तक्रार मिळाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल.

बातम्या आणखी आहेत...