आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षा दलाची कारवाई:काश्मिरात 2 ‘हायब्रिड’दहशतवाद्यांना अटक

श्रीनगर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लष्कर-ए-तोयबाच्या दोन हायब्रिड दहशतवाद्यांना काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांनी अटक केली आहे. बांदिपुरा जिल्ह्यात स्फोटके पेरण्याच्या कटात हे दोघे सहभागी होते. त्यांच्याकडून तीन रिमोट कंट्रोल स्फोटकेही जप्त करण्यात आली. एखाद-दोन दहशतवादी कारवाया करून पुन्हा सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे साळसूदपणे जीवन जगणाऱ्यांना हायब्रिड अतिरेकी म्हणतात. ईर्शाद अहमद गनी उर्फ शाहिद आणि वासिम राजा लोन अशी अटक करण्यात आलेल्या अतिरेक्यांची नावे आहेत. पांढऱ्या रंगाच्या बॅगा घेऊन हे दोघे जात असताना पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पकडले.

बातम्या आणखी आहेत...