आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासीआरपीएफच्या विशेष लढाऊ पथक कोब्राचे सेकंड इन कमांड अधिकारी संदीप द्विवेदी यांनी माध्यमांशी बोलताना आपला अनुभव शेअर केला. तो बोलताना म्हणाला की, आम्ही शुक्रवारी रात्रभर पायपीट करत शनिवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास विजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या बॉडर परिसरातील जोनागुडा भागात पोहचलो. दरम्यान आम्हाला नक्षलवाद्यांच्या हालचाली दिसल्या. त्यांनी आमच्या टीमवर ताबडतोब गोळीबार सुरु केला. आमच्या सैनिकांनी शौर्य दाखवत चांगला प्रत्युत्तर दिला. नक्षलवाद्यांनी आम्हाला त्यांच्या हल्ल्यात अडकविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आम्ही त्यामध्ये न अडकता समोर चालत राहिलो.
संदीप या हल्यात जखमी झाला असून त्याच्या उजव्या हाताला मलमपट्टी गुंडाळलेली आहे. पायालाही गंभीर दुखापत झाली आहे. परंतु, एवढे सारे होऊनही त्याच्या चेहऱ्यावर हास्य आणि जोश कायम आहे. माध्यमांशी बोलताना तो मधात नेहमी हसत होता.
साथीदारांना वाचवताना जखमी झाला संदीप
विजापूरमध्ये झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांनी संदीपवर गोळीबार सुरु केला. डोंगराच्या उंचीवरुन बॉम्बस्फोट केला. दरम्यान त्यांनी आपल्या सहकारी साथीदारांना वाचवताना चोख प्रत्युत्तर दिले. परंतु, तेवढ्यात झालेल्या एका स्फोटात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला हवाई दलाच्या साहाय्याने हेलिकॉप्टरमधून रायपूर येथे आणण्यात आले होते. त्यांच्यावर आता एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गृहमंत्र्यांने सांगितले, लवकर बरा होशील
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी रायपूर येथील रामकृष्ण केअर हॉस्पिटला भेट दिली. दरम्यान, त्यांनी संदीप द्विवेदी भेटून त्याच्या आरोग्याची विचारपूस केली आणि आराम करत लवकर बरे होण्याचा सल्ला दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.