आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 2 Killed, 60 Injured In Police Firing; Curfew In 2 Police Stations, Arrest Of More Than 110 People Including Accused

बंगळुरूमध्ये आक्षेपार्ह फेसबुक पोस्टमुळे हिंसा:पोलिसांच्या गोळीबारात 2 ठार, 60 पोलिस जखमी; पोलिस ठाण्याच्या 2 भागात कर्फ्यू, आरोपींसह 110 हून अधिक जणांना अटक

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बेंगळुरूमध्ये कलम 144 लागू, येथे डीजे हल्ली, केजी हल्ली पोलिस स्टेशन परिसरात कर्फ्यू लागू
  • कॉंग्रेस आमदाराच्या पुतण्याने आरोप निराधार असल्याचे म्हणाले, फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचा केला दावा

आक्षेपार्ह फेसबुक पोस्टवरून मंगळवारी रात्री बेंगळुरूमध्ये हिंसाचार उफाळला. पोलिस स्टेशनला आग लावण्यात आली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात 2 जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी 60 हून अधिक पोलिस जखमी झाले. यामध्ये अतिरिक्त पोलिस आयुक्तांचा समावेश आहे.

शहरातील डीजे हल्ली आणि केजी हल्ली पोलिस स्टेशन भागात हिंसाचार झाला. सध्या येथे कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्याचबरोबर संपूर्ण बंगळुरूमध्ये कलम 144 लागू करण्यात आली आहे. आतापर्यंत 110 लोकांना अटक करण्यात आली आहे.

पोलिस स्टेशनमध्ये तोडफोड, गाड्यांचे नुकसान
पोलिस स्टेशनमध्ये तोडफोड, गाड्यांचे नुकसान

पोलिस आयुक्तांनी सांगितले- आरोपींना अटक
असा आरोप केला जात आहे की कॉंग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्ती यांचे पुतणे नवीन यांनी एका विशिष्ट समुदायाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली. यामुळे समाजातील लोक संतापले. आयुक्त कमल कांत म्हणाले की, आरोपी नवीनला अटक करण्यात आली आहे. कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, हिंसाचारग्रस्त भागात अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. उपद्रवी व्यक्तींवर कारवाई केली जाईल.

काँग्रेस आमदार मुर्ती यांच्या घराबाहेर जाळपोळ
काँग्रेस आमदार मुर्ती यांच्या घराबाहेर जाळपोळ

काँग्रेस आमदाराच्या घरासमोर जाळपोळ
कॉंग्रेसचे आमदार मूर्ती यांच्या घराची तोडफोड करुन बाहेर जाळपोळ करण्यात आली. गाड्यांना आग लावण्यात आली. आमदारांनी लोकांना हिंसाचार करु नये असे आवाहन केले. "मी लोकांना आवाहन करतो की काही उपद्रवी लोकांच्या चुकांमुळे आपण हिंसाचारास भाग घेऊ नये," असे त्यांनी व्हिडिओ संदेशात सांगितले.

जमावाकडून पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ
जमावाकडून पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ

आमदाराचा पुतण्या म्हणाला - आयडी हॅक झाला होता
यासंदर्भात कॉंग्रेस आमदाराच्या पुतण्याने स्पष्टीकरण सादर केले आहे. त्याचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचे त्याने सांगितले. त्यांनी कोणत्याही धर्मावर भाष्य केलेले नाही. आमदार मूर्ती यांनी पुतण्याच्या बचावात निवेदनही दिले.

बातम्या आणखी आहेत...