आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीच्या फुटवेअर फॅक्ट्रीत आग, 2 ठार:तिसऱ्या मजल्यावर 100 मजूर करत होते काम, 20 जणांची सुटका; अनेकजण अडकल्याची भीती

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीच्या नरेला औद्योगिक क्षेत्रातील एका पादत्राणे तयार करणाऱ्या कारखान्याला मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. त्यात 2 मजुरांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कारखान्यात आणखी काही मजूर अडकल्याची भीती असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दिल्लीच्या नरेलाच्या भोरगढ औद्योगिक क्षेत्रातील एका प्लॅस्टिकच्या कारखान्याला मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. या कारखान्यात पायातील वाहने तयार केली जातात. आग लागली तेव्हा कारखान्यात जवळपास 100 कामगार काम करत होते. त्यातील 2 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर 20 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली. यातील काहींना गंभीर भाजले आहे. घटनास्थळी अग्निशमन विभागाच्या 10 बंबांद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आगीच्या ज्वाळांवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. पण संपूर्ण इमारत धुराने भरली आहे.
आगीच्या ज्वाळांवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. पण संपूर्ण इमारत धुराने भरली आहे.

ही आग कारखान्याच्या तिसऱ्या मजल्याला लागली. पोलिसांच्या माहितीनुसार आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. पण ती अद्यापही धूमसत आहे.

काही मजूर अडकल्याची भीती

आग लागली तेव्हा 100 मजूर कारखान्यात काम करत होते. सकाळच्या वेळी आग लागल्यामुळे फॉग व धुरामुळे त्यांना तत्काळ बाहेर पडता आले नाही. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उंच शिड्यांच्या मदतीने 20 जणांना बाहेर काढून रुग्णालयात पाठवले. यातील अनेक मजूर होरपळले आहेत. इमारतीत आणखी काही कामगारांचे मृतदेह आढळण्याची शक्यता आहे.

शिड्यांच्या माध्यमातन मजुरांची सुटका करताना अग्निशमन विभागाचे कर्मचारी.
शिड्यांच्या माध्यमातन मजुरांची सुटका करताना अग्निशमन विभागाचे कर्मचारी.

जखमींवर नरेलाच्या सत्यवादी राजा हरिश्चंद्र रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...