आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 2 Lakh Compensation With 9% Interest For 23 Years To Heirs Of 108 Missing Persons Supreme Court Orders Maharashtra Government In 1992 Riots Case

मुंबई दंगल:बेपत्ता 108 जणांच्या वारसांना 23 वर्षांपासून 9%व्याजासह 2 लाख भरपाई द्या, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

११९२ मुंबईच्या जातीय दंगलीत बेपत्ता झालेल्या १६८ पैकी १०८ जणांच्या वारसांना २२ वर्षे अकरा महिन्यांचे प्रत्येकी ९ टक्के व्याजासह २ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला शुक्रवारी दिले. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमर्ती संजय किशन कौल, अभय ओक आणि विक्रम नाथ यांच्यासमोर सुनावणी झाली. ११९२ मध्ये मुंबईत जातीय दंगल उसळली होती. यात सुमारे १६८ जण बेपत्ता झाले होते. यातील १०८ जणांची ओळख पटवण्यात यश आले होते. मात्र, बेपत्ता झालेल्या वारसांना आजवर नुकसान भरपाई मिळाली नाही. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने सरकारला आदेशान्वित करताना सांगितले की, बेपत्ता झालेल्या नागरिकांच्या वारसदारांना शोधा, त्यांचे नाव, पत्ता सर्व काही गोळा करून पुन्हा एक अहवाल आमच्यापुढे सादर करा. तसेच बेपत्ता झालेल्यांच्या वारसांना तातडीने नुकसान भरपाई द्या. १९९२ च्या मुंबई दंगलीत सुमारे ९०० जणांचा मृत्यू झाला होता, तर १६८ जण बेपत्ता झाले होते. तसेच १२ मार्च १९९३ मध्ये उसळलेल्या दंगलीत २५७ जणांचा मृत्यू झाला होता. चौदाशे जण जखमी झाले होते. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वाेच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

राज्य मुख्य सचिवांच्या निगराणीखाली समिती नियुक्त सुनावणीदरम्यान न्यायालयाने राज्याच्या मुख्य सचिवांच्या निगराणीखाली समितीही नियुक्ती केली. ही समिती या प्रकरणाची अंमलबजावणी व्यवस्थित होते की नाही यावर लक्ष ठेवेल. तसेच सरकारने या प्रकरणात महसूल अधिकाऱ्याची नेमणूक करावी, असेही आदेश न्यायालयाने या वेळी दिले.

बातम्या आणखी आहेत...