आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 2 Migrant Labourers Attacked By Terrorists In Anantnag Jammu Kashmir| Their Condition Is Alarming

अनंतनागमध्ये स्थलांतरित मजुरांवर हल्ला:शाळेत काम करणाऱ्या मजुरांवर दहशतवाद्यांनी केला गोळीबार, प्रकृती चिंताजनक

जम्मू-काश्मीर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा स्थलांतरित मजुरांना लक्ष्य केले आहे. अनंतनाग जिल्ह्यातील बोंडियालगाम येथे दहशतवाद्यांनी दोन स्थलांतरित मजुरांवर गोळीबार केला. त्यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने दोघांनाही रुग्णालयात दाखल केले.

मजूर बिहार आणि नेपाळमधील
काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले की, दोन्ही मजूर एका खासगी शाळेत काम करत होते. यादरम्यान दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. हे मजूर बिहार आणि नेपाळचे रहिवासी आहेत. ते एसएपीएस स्कूल, बोंडियलगाम येथे काम करतात. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

पुंछ सेक्टरमध्ये 3 दहशतवादी ठार
या हल्ल्यापूर्वी गुरुवारीच पुंछ सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. लष्कराने यावर कारवाई केली तेव्हा दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा जवानांनीही गोळीबार सुरू केला. यादरम्यान जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईनंतर झडतीदरम्यान लष्कराने पिस्तूल, रायफलसह अनेक शस्त्रे जप्त केली.

काश्मिरी पंडितांची हत्या करणारा दहशतवादी ठार
मंगळवारी पुलवामाच्या अवंतीपोरामध्ये सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला. खोऱ्यातील काश्मिरी पंडित आणि परप्रांतीयांवर हल्ले करणारा लष्कर कमांडर मुख्तार भट याचाही यात समावेश आहे. त्याच्यासोबत पुलवामाचा सकलेन मुश्ताक आणि पाकिस्तानी दहशतवादी मुशफिक यांचाही खात्मा झाला आहे. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांकडून शस्त्रांचा मोठा साठाही जप्त केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हे दहशतवादी सुरक्षा दलांच्या कॅम्पमध्ये आत्मघाती हल्ल्याची योजना आखत होते. यापूर्वी कुपवाडा येथे एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...