आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवाई वाहतूक महासंचालकांनी केली कारवाई:स्पाइसजेटच्या 50 टक्के उड्डाणांवर 2 महिने बंदी

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हवाई वाहतूक महासंचालकांनी (डीजीसीए) स्पाइसजेटच्या ५०% विमानांवर दोन महिन्यांपर्यंत बंदी घातली आहे. डीजीसीएनुसार, वेगवेगळे स्पॉट चेक, निरीक्षण आणि कंपनीने दिलेल्या कारणे दाखवा नोटिसांची उत्तरे पाहिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या बंदीबाबत स्पाइसजेटने म्हटले की,‘आम्ही नियामकांच्या निर्देशांनुसार काम करू.’ हवाई वाहतूक राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी अलीकडेच राज्यसभेत सांगितले होते की, डीजीसीएने ९ जुलै ते १३ जुलैदरम्यान स्पाइसजेटच्या ४८ विमानांची तपासणी केली, पण मोठे सुरक्षा उल्लंघन आढळले नाही.

बातम्या आणखी आहेत...