आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपघात:केरळच्या कोचीमध्ये नौदलाच्या ग्लायडरचा भीषण अपघात, दोन नौदल अधिकाऱ्यांनी गमावला जीव

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अपघातामध्ये लेफ्टनंट राजीव झा (39) आणि पेटी ऑफिसर सुनील कुमार (29) यांचा मृत्यू झाला आहे.

केरळ येथील कोचीमध्ये नौदलाच्या ग्लायडरचा भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या अपघातामध्ये दोन नौदल अधिकाऱ्यांनी जीव गमावला आहे. नौदलाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, केरळच्या कोची जिल्ह्यामध्ये रविवारी सकाळी थोप्पुम्पदी पूलाजवळ एका ग्लायडरचा अपघात झाला. या अपघातामध्ये लेफ्टनंट राजीव झा (39) आणि पेटी ऑफिसर सुनील कुमार (29) यांनी जीव गमावला आहे.

एएनआयनेही या संदर्भात वृत्त दिले आहे. यानुसार कोची नौदलाच्या बेसवरून पॉवर ग्लायडरने लेफ्टनंट राजीव झा आणि सुनील कुमार हे रवाना झाले होते. दरम्यान त्यांचा अपघात झाला आहे. रोजच्या प्रशिक्षणादरम्यान ही दुर्घटना झाली. या दुर्घटनेत दोन्हीही अधिकारी जखमी झाले होते. उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र यावेळी त्यांचा मृत्यू झाला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser