आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मू-काश्मीरमधील पर्यटनस्थळ गुलमर्गमध्ये बुधवारी झालेल्या हिमस्खलनात पोलंडच्या दोन स्कियर्सचा मृत्यू झाला. मदत आणि बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांनी १९ जणांना वाचवले. बारामुल्लातील प्रसिद्ध स्की रिसॉर्ट अफरवाट शिखराच्या हापथखुद येथे दुपारी सुमारे १२.३० वाजता हिमस्खलन झाले. प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, २० फूट उंच बर्फाचा डोंगर पोलंडचे १२ व रशियाच्या ८ पर्यटकांसह दोन स्थानिक गाइडच्या अंगावर पडला. लोकांना वाचवण्यासाठी १४ हजार फूट उंचीवरील केबल कारचा वापर केला. दुसरीकडे श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग भूस्खलनामुळे तिसऱ्या दिवशीही बंद होता. यामुळे ६०० वर ट्रक रस्त्यात अडकले.
आज पावसाची शक्यता, थंडीपासून दिलासा नाही
हवामान विभागानुसार, तामिळनाडू आणि केरळच्या दक्षिण भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. श्रीलंका-तामिळनाडूच्या समुद्रकिनारी हवामान खराब राहील. यादरम्यान ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.