आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयानंतर निश्चित होईल संसदीय टर्मची मर्यादा:भाजपमध्ये खासदारांचा 2 कार्यकाळांचा फॉर्म्युला ठरला; 2024 पासून होणार लागू

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवडणुकीच्या राजकारणासाठी वयोमर्यादा निश्चित केल्यानंतर भाजप आता आपल्या खासदारांचा कमाल कार्यकाळ दोन करणार आहे. म्हणजेच भाजपचा कोणताही सदस्य दोनपेक्षा जास्त वेळा लोकसभा व राज्यसभेचा सदस्य राहणार नाही. हा फॉर्म्युला २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर लागू होईल. भाजपचे एक नेते म्हणाले, नवोदितांना खासदार म्हणून संधी मिळावी, असे पंतप्रधान मोदींना वाटते. अनेकदा एकाच मतदारसंघातून लोकसभा किंवा राज्यसभेचे खासदार झालेले लोक स्वत:ला प्रस्थापित मानतात.

सध्याच्या लोकसभेतील काही सदस्य ८-९ वेळा खासदार झाले आहेत. बहुतांश आजी खासदार आपले तिकीट पक्के मानतात. अशा वेळी नव्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळत नाही. तिकीट न मिळाल्यास खासदार आणि संधी न मिळाल्यास नवे नेते बंड करतात. दोन्ही स्थितीत नुकसान पक्षाचेच होते. सूत्रांनुसार, खासदारांचा कार्यकाळ निश्चित करण्यावर दोन वर्षांपासून चर्चा सुरू आहे. पक्ष २०२४ ला याची डेडलाइन बनवेल. २०२४ आणि २०२९ मध्ये लोकसभा जिंकणाऱ्यांना २०२४ मध्ये तिकीट मिळणार नाही. तथापि, कोणत्याही एका सभागृहात दोन टर्म पूर्ण केलेल्यांना दुसऱ्या सभागृहात संधी मिळू शकते.

बातम्या आणखी आहेत...