आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 2 Terrorists Killed, AK 47 And Large Quantity Of Ammunition Seized In Kashmir's Naugam Sector

एलओसीवर घुसखोरीचा प्रयत्न:काश्मीरच्या नौगाम सेक्टरमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एके-47 आणि मोठ्या प्रमाणावर दारुगोळा जप्त

श्रीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
Advertisement
Advertisement

काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील नौगाम सेक्टरमध्ये सुरक्षादलाच्या जवानांनी 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. हे दहशतवादी एलओसीमधून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. जवानांनी यांच्याकडून दोन एके-47 आणि भरपूर प्रमाणात दारुगोळा जप्त केला आहे. लष्कर प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार जवानांना शनिवारी सकाळी पहाटे नौगाम सेक्टरमध्ये संशयास्पद हालचाल दिसून आली त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

सुरक्षादलाच्या जवानांनी या महिन्यात आतापर्यंत 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यापूर्वी पुलवामा जिल्हयातील गोसू भागात एका दहशतवाद्याला ठार केले होते. या चकमकीत एक जवानही शहिद झाला होता. 4 जुलैला कुलगामच्या अराह भागात हिजबुल मुजाहिद्दीनच्या 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते.2 जुलैला श्रीनगरच्या मालबाग भागात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता.

Advertisement
0