आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 2 Years Of Chandrayaan 2 In Lunar Orbit, Confirmed That There Is Water On The Moon

उपग्रह:चांद्रयान-2ची चंद्राच्या कक्षेत 2 वर्षे, चंद्रावर पाणी असल्याचा दिला दुजोरा

नवी दिल्ली / अनिरुद्ध शर्मा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताच्या चांद्रयान-१ मोहिमने चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याचा शोध लावला होता. चांद्रयान-२ ने त्याची खातरजमा केली आहे. चांद्रयान-२ उपग्रहाने चंद्राच्या कक्षेत २ वर्षे पूर्ण केली. यादरम्यान त्याने चांद्रयान-१ कडून मिळालेल्या माहितीला दुजोरा दिला, तसेच प्रचंड नवीन माहिती आकडेवारी आणि छायाचित्रेही उपलब्ध करून दिली आहे. चंद्राच्या कक्षेत चांद्रयान-२ ने आजवर ९ हजारांपेक्षा जास्त फेऱ्या मारल्या आहेत.

इस्रोद्वारे आयोजित कार्यशाळेत ही माहिती समोर आली. त्यात चांद्रयान-२ कडून मिळालेली आकडेवारी व माहिती वैज्ञानिकांना दिली जात आहे. इस्रोचे प्रमुख के. सिवन म्हणाले, ‘चांद्रयान-२ अध्ययनासाठी अनेक प्रकारे कामी येत आहे. त्याने पाठवलेली चंद्राची छायाचित्रे व आकडेवारी उत्साहजनक आहेत. हा उपग्रह चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे १०० किमीवर घिरट्या घालत आहे.’ चांद्रयान-२ च्या प्रकल्प संचालक वनिता एम. म्हणाल्या, ‘उपग्रहाची यंत्रणा चांगल्या काम करत आहे. उपग्रह पुढील ५ वर्षे सेवा बजावेल.’

बातम्या आणखी आहेत...