आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओडिसा-तेलंगणामध्ये मुसळधार पाऊस:हैदराबादमध्ये 24 तासांमध्ये 20 सेमी पाऊस, घरावर दरड कोसळल्याने 2 महिन्याच्या बाळासह 9 जणांचा मृत्यू

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हवामान विभागानुसार, बंगालच्या खाडीमध्ये कमी दबावाचा पट्टा निर्माण झाल्याने तेलंगणा आणि ओडिसाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होत आहे
  • ओडिसाच्या गजपती जिल्ह्यात पावसाने बाधित झालेल्या 12 गावातील 500 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे

मंगळवारी रात्रीपासून तेलंगणाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. राजधानी हैदराबादमध्ये गेल्या 24 तासात 20 सेमी पाऊस पडला. यानंतर शहरातील रस्त्यांवर प्रचंड पाणी जमा झाले. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे अनेक वाहने वाहून गेली. शहरातील बंडलगुडा भागात घरावर दरड कोसळल्याने 2 महिन्यांच्या मुलासह 9 जण ठार तर 3 जखमी झाले. या लोकांच्या मदतीसाठी पोलिस-प्रशासन सतर्क केले गेले आहे. त्याचबरोबर ओडिशामध्येही मुसळधार पाऊस झाला आहे. गजपतीमध्ये 12 गावातून 500 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने परिणाम
हवामान विभागानुसार, बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तेलंगणा आणि ओडिसाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. ग्रेटर हैदराबाद म्यूनिसिपल कॉर्पोरेशन (जीएचएमसी)ने ट्विट केले, 'एलबी नगरमध्ये 25 सेमी पावसाची नोंद झाली आहे. काही तास अजून पाऊस सुरू राहू शकतो. लोकांना आवाहन आहे की, त्यांनी घराबाहेर पडू नये आणि सुरक्षित राहावे. राज्य आपत्ती निवारण दल आणि अग्निशमन सेवा विभागाचे कर्मचारी पाणी जमा झालेल्या भागात लोकांना सुरक्षित बाहेर काढत आहेत.

सर्व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना मुख्य सचिवांची अॅडव्हायजरी
तेलंगाणाचे मुख्य सचिव सोमेश कुमार यांनी सर्व जिल्हा प्रशासनांना अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहे. त्यांनी सर्व कलेक्टर, पोलिस कमिश्नर, एसपी यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. मंगळवारी रात्री त्यांनी अधिकाऱ्यांना म्हटले - 'मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या परिस्थितीविषयी माहिती घेतली. त्यांनी संपूर्ण जिल्हा प्रशासनाला अलर्ट राहण्याची ऑर्डर दिली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. अनेक वाईट घटनाही समोर आल्या आहेत. मी आणि डीजीपी हैदराबादच्या सीनियर अधिकाऱ्यांसोबत फोनद्वारे संपर्कात आहोत. सर्व जिल्ह्याचे अधिकारी टेलीकॉन्फ्रेंसने आपल्या मंडळ ऑफिसर्सच्या संपर्कात राहा. सखल भागांमध्ये पाणी साचण्याची समस्या होऊ शकते.'

असदुद्दीन ओवेसींनी केला पावसामुळे प्रभावित झालेल्या परिसरांचा दौरा
एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन औवैसी यांनी मंगळवारी रात्री पावसाने प्रभावित परिसराचा दौरा केला. त्यांनी यानंतर ट्विट केले - 'मी बंडलगुडा परिसराचा आढावा घेण्यासाठी गेलो होतो. येथे एका खासगी इमारतीची भिंत कोसळली. यामध्ये 9 लोकांचा मृत्यू झाला आणि दोन जखमी झाले आहेत. तेथून परतत असताना मी शमशाबादमध्ये अडकलेल्या काही बस प्रवाशांना लिफ्ट दिली. आता मी तलबकट्टा आणि येसराबनगरला जात आहे. तेथून कारवान येथे जाईल. यावर्षी जास्त पाऊस पडत आहे, मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की, आपल्या घरात राहा. अकबरुद्दीन यांनी रुग्णालयात जाऊन पावसात झालेल्या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या लोकांची भेट घेतली.'

उपराष्ट्रपती वेंकय्या नायडूंनी शोक व्यक्त केला
उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी ट्विट केले - तेलंगाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि ओडिशामध्ये जोरदार पावसामुळे लोकांचा मृत्यू झाल्यानंतर मी दुःखी आहे. माझ्या संवेदना मृतांच्या कुटुंबियांसोबत आहेत. मी लोकांना आवाहन करतो की, लोकल अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करा आणि सुरक्षित राहा.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser