आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमवल्याप्रकरणी केंद्र सरकारची सल्लागार सेवा देणारी कंपनी वाप्कोसचे निवृत्त सीएमडी राजिंदरकुमार गुप्ता यांच्या ठिकाणांवर मंगळवारी सीबीआयने छापे टाकले. यादरम्यान २० कोटींपेक्षा अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली.
गुप्ता यांच्याविरुद्ध नुकताच उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता मिळवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीबीआयचे अधिकारी म्हणाले, गुप्ता आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्या निवासस्थानांची झडती घेण्यात आली. यामध्ये २० कोटी रुपये रोख रकमेशिवाय इतर किमती सामानाची कागदपत्रे आढळली आहेत. वाप्कोस हा केंद्रीय जलसंपदा मंत्रालयांतर्गत सरकारची संपूर्ण मालकी असलेला सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आहे. ही ‘लघुरत्न’ तथा ‘आयएसओ ९००१:२००८’ प्रमाणित कंपनी आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.