आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भास्कर ग्राउंड रिपोर्ट:महागड्या लॉजिस्टिकमुळे सिमेंटमध्ये २०% वाढ, ७० टक्के उत्पादन सुरू

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिअल इस्टेट आणि इन्फ्रा प्रोजेक्ट ठप्प झाल्याने मागणीत घट
  • राजस्थान, एमपी, महाराष्ट्र, छत्तीसगड, बिहार, झारखंड येथे सिमेंटचे एक तृतीयांश उत्पादन
  • स्थानिक पातळीवर मजूर उपलब्ध त्यामुळे कमी परिणाम झाला

अनलॉक-१ नंंतर देशात पायाभूत सुविधा आणि रिअल इस्टेटमध्ये वेगाने काम सुरू झाले आहे. यामुळे देशात सिमेंटच्या मागणीत ६०% वाढ झाली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांत सिमेंट उत्पादन ७०% क्षमतेसह सुरू झाले आहे. ही सर्व राज्ये देशाच्या एकूण ३३ कोटी टन वार्षिक सिमेंटच्या उत्पादनाच्या एक तृतीयांश योगदान देतात. सिमेंट कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, लॉजिस्टिक्स आणि मजुरांच्या तुटवड्यामुळे सिमेंट उत्पादनाचा खर्च वाढला आहे. मध्य प्रदेशात सिमेंटच्या प्रतिबॅग किमतीत २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली. येथे सिमेंटची किंमत ३४५ ते ३५५ रु. प्रतिबॅग आहे. मध्य प्रदेशात १५ कंपन्यांचे प्रकल्प वार्षिक एक टन सिमेंट उत्पादन करतात. आता येथे ३० टक्के घटून प्रतिमहा ५ ते सहा लाख टन उत्पादन होत आहे. राजस्थानचे उद्योगमंत्री परसादी लाल यांच्यानुसार, सर्व २४ सिमेंट प्लँट्समध्ये उत्पादन सुरू झाले आहे. मात्र, सामान्य दिवसांच्या तुलनेत साधारण ७५ टक्के राहिले आहे. सिमेंट प्लँट क्षमतेच्या ८०% पर्यंत उत्पादन करत आहेत. महाराष्ट्राची क्षमता ३.८ कोटी टन सिमेंट उत्पादनाची आहे. बाजारात मागणी नसल्याने कंपन्यांत ३० ते ४० टक्के उत्पादन होत आहे. सिमेंट बॅगच्या दरात ६० ते ८० रुपयांची वाढ झाली आहे.  इंडिया सिमेंटचे मनोज कस्तुरे म्हणाले, पावसामुळे बांधकामे थांबतात. त्यामुळे पितृपक्ष आणि गणेश उत्सवानंतर या क्षेत्रात तेजी येण्याची अपेक्षा आहे. छत्तीसगडमध्ये गेल्या महिन्यात मागणीत तेजी आल्याने आता ७०% उत्पादन क्षमतेवर काम होत आहे. बिहारमध्ये अद्यापही मजूर टंचाईमुळे सिमेंट युनिट पूर्ण क्षमतेने काम करत नाहीत. झारखंडमध्ये प्रलंबित कामांची मेमध्ये मागणी वाढली होती. यामुळे कंपन्यांची विक्री मार्चएवढीच पोहोचू शकली. मात्र, जूनमध्ये नवे  प्रोजेक्ट सुरू न झाल्याने मागणी घटलीे. हिमाचल प्रदेशात ४०% सिमेंट उत्पादन होत आहे.

५० टक्के वाहतूक रेल्वेतून, डॅमरेजमध्ये सवलतीची मागणी
मध्य प्रदेश सिमेंट स्टॉकिस्ट असोसिएशनचे पवन खंडेलवाल म्हणाले, डिस्टन्सिंग व निर्जंतुकीकरणामुळे खर्च वाढला आहे. सिमेंट उद्योगाची ५०% वाहतूक रेल्वेतून होते. लॉकडाऊनमध्ये रेल्वेने डॅमरेज म्हणजे रॅक खाली करण्याचा वेळ आणि बार्केज म्हणजे प्लॅटफॉर्मवर सिमेंट ठेवण्याच्या वेळेत सूट दिली होती. मात्र, आता काही रेल्वे मंडळांत सूट संपवत दिलाशाच्या नावाखाली बस वेळ दुप्पट केली आहे. मजुरांच्या कमतरतेमुळे रॅकमधून माल रिकामा करण्यात खूप वेळ लागत आहे. डॅमरेज व बार्केज शुल्कातून सूट मिळाल्यास सिमेंट दर घटू शकतात.

सिमेंट उद्योग इन्फ्राचा कणा

33.73 कोटी टन सिमेंट उत्पादन झाले २०१८-१९ मध्ये.  27.8 कोटी टन उत्पादन एप्रिल १९ पासून जानेवारी २० पर्यंत झाले. 210  मोठे प्रकल्प देशात, ज्यांची ४१ कोटी उत्पादन क्षमता आहे. 350 प्रकल्प लहान आकाराचे आहेत. 20 कंपन्यांकडे देशाच्या सिमेंट उत्पादनात ७० टक्के हिस्सेदारी आहे.

या आहेत अडचणी

  • लॉजिस्टिकमध्ये रिटर्नमध्ये लोडिंग न मिळाल्याने भाड्यात १५ ते २० टक्के वाढ होईल.
  • मजुरांच्या टंचाईमुळे रेल्वेचे डॅमरेज आणि बॉर्केज चार्जेस लागतात.
  • फिजिकल डिस्टन्सिंग व निर्जंतुकीकरणामुळे प्लँट पूर्ण क्षमतेने उत्पादन न करणे.
  • रिअल इस्टेटमुळे मागणीत ५०% घट आली आहे. सरकारी इन्फ्रा. प्रोजेक्ट्समुळे मागणी घटली

सिमेंट प्लँट्समध्ये स्थानिक लोकांना रोजगार दिला जातो. यामुळे कामगारांपासून सिमेंट उद्योगासमोर समस्या नाहीत. मजुरांची समस्या वाहतूक क्षेत्रात आहे. किमतीत मागणी-पुरवठ्याच्या हिशेबाने बदल होतात. कारण, सिमेंट दीर्घकाळापर्यंत साठवून ठेवता येत नाही. जे.सी. तोष्णीवाल, एमडी, वंडर सिमेंट 

बातम्या आणखी आहेत...