आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अँटी करप्शन ब्युरो अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका तहसीलदाराच्या घरावर धाड टाकली. त्यानंतर तहसीलदाराने जे काही केले त्यावर सगळेच हैराण झाले. तहसीलदाराने ACB चे अधिकारी पाहताच आपल्या एका खोलीत स्वतःला कोंडून घेतले. त्यानंतर 20 लाख रुपये किमतीच्या भ्रष्टाचारातून गोळा केलेल्या नोटांना त्याने चक्क आग लावली. प्रत्यक्षात पकडल्या जाणाच्या भीतीने त्याने पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केला होता. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
राजस्थानच्या सिरोही येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. सिरोहीतील भावरी येथे महसूल अधिकारी पर्बत सिंहला ACB ने एक लाख रुपयांच्या लाच प्रकरणी अटक केली. त्याने चौकशीत यामध्ये पिंडवाडाचा तहसीलदार कल्पेश जैनचा हात असल्याचे सांगितले. माहिती मिळताच एसीबीचे अधिकारी कल्पेशच्या घरावर पोहोचले. पण, याची माहिती कल्पेशला आधीच मिळाली होती.
अधिकारी येण्यापूर्वीच घरी पोहोचला कल्पेश
ACB चे अधिकारी आपल्या घरात पोहोचण्यापूर्वीच तो घरी आला आणि स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले. यानंतर त्याच्या मागेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची टीम सुद्धा घरी पोहोचली. पण, कल्पेशने दार उघडलेच नाही. त्याने नोटांचे बंडलच्या बंडल हातात घेऊन पेटत्या गॅस स्टोव्हवर ठेवले आणि सर्व नोटा जाळल्या. ACB चे अधिकारी त्याला दार उघडण्याची विनंती करत होते पण त्याने कुणाचेच ऐकले नाही. या संपूर्ण घटनेचा अधिकाऱ्यांनी व्हिडिओ तयार केला आहे.
काय आहे प्रकरण?
पिंडवाडा पोलिसांना सुद्धा घटनास्थळी बोलावण्यात आले. यानंतर एका तासाच्या खटाटोपानंतर अखेर दार कापून उघडण्यात आले. ही कारवाई बुधवारी रात्री उशीरापर्यंत सुरूच होती. त्याने एकूण 20 लाख रुपयांच्या नोटा जाळल्या. त्यातील काही अर्धवट जळालेल्या नोटा ACB च्या टीमने जप्त केल्या आहेत.
या प्रकरणात मूलसिंह नावाच्या एका व्यक्तीने ACB कडे तक्रार दिली होती. मूलसिंहने आरोप केला होता, की पिंडवाडा येथील आवळ्यांच्या सालींचा लिलाव केला जातो. त्यामध्ये कल्पेशने कंत्राट देण्यासाठी 5 लाख रुपयांची लाच मागितली होती. त्याने यासंदर्भात महसूल अधिकारी पर्बत सिंह याच्याशी बोलण्यास सांगितले होते. पर्बत सिंहने एक लाख रुपये घेऊन नंतर 4 लाख देण्यास सांगितले होते. हेच एक लाख घेत असताना तो ACB च्या सापळ्यात अडकला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.