आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 20 Thousand Crores, 76% Of The Material Is Indigenous, So 85% Of The Amount Goes Back To The Indian Economy

'INS विक्रांत'मुळे शत्रूला धडकी:20 हजार कोटींत तयार, 76% साहित्य स्वदेशी, त्यामुळे 85% रक्कम भारतीय अर्थव्यवस्थेत परतली

के. ए. शाजी | कोचीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ‘आयएनएस विक्रांत’ ही पहिली स्वदेशनिर्मित लढाऊ नौका नौदलात समाविष्ट केली. कोचीन शिपयार्डने ती बनवली आहे. नौदलानुसार, विक्रांतसाठी २० हजार कोटी रु. चा खर्च आला. देशात निर्मित आणि ७६% स्वदेशी साहित्याचा वापर केल्यामुळे ८०-८५ % पैसा भारतीय अर्थव्यवस्थेत परतला आहे. त्यामुळे शिपयार्डच्या २ हजारांना प्रत्यक्ष आणि १३ हजार जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळाला.

मूळ योजनेत केले ५ हजार बदल, पोलाद निर्मितीही देशातच मधू ए. नायर, एमडी, कोचीन शिपयार्ड विक्रांत ही भारतात निर्मित सर्वात मोठी युद्धनौका तर आहेच, शिवाय एवढ्या मोठ्या आकाराची पहिली भारतीय युद्धनौका आहे. तिच्या निर्मितीपूर्वी कोचीन शिपयार्डकडे फक्त आयएनएस विराटच्या देखभालीचा अनुभव होता. पण आम्ही आव्हानाचे रूपांतर संधीत केले. आम्ही शून्यापासून सुरुवात केली. युद्धनौकेचा विशाल आकार आणि प्रकल्पाचे मोठे निकष पाहता मूळ योजनेत ५ हजारपेक्षा जास्त बदल करण्यात आले. आता आम्ही आठ वर्षांतच अशी युद्धनौका तयार करू शकतो. विक्रांतच्या निर्मितीसाठी १३ वर्षे लागली. युद्धनौका निर्मिती हे पुरुषप्रधान क्षेत्रच मानले जात होते. पण विक्रांतने हा समजही खोटा ठरवला. विक्रांतला रूप देण्यात ३०० महिलांचे योगदान मिळाले. नौदलाने १९९० मध्ये युद्धनौका निर्मितीचा विचार केला होता. तथापि, वर्क ऑर्डर २००४ मध्ये मिळाली. आणखी एक आव्हान होते, ते म्हणजे पोलादाचे. २००५ मध्ये रशियाकडून पोलाद खरेदी करण्याची योजना तयार करण्यात आली, पण ती प्रत्यक्षात येऊ शकली नाही. त्यामुळे प्रकल्पाला २ वर्षे विलंब झाला. नंतर डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरीने देशातच पोलाद तयार केले आणि स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडियाने विक्रांतसाठी २२ हजार टन विशेष पोलादाची निर्मिती केली. ते डीएमआर २४९ पोलाद विशेष श्रेणीचे होते. पोलाद मिळवल्यानंतरही आव्हाने कमी झाली नव्हती.

उत्कृष्ट श्रेणीचे पोलाद वेल्ड करता येऊ शकेल असे कुठलेही तंत्रज्ञान देशात नव्हते. तेव्हा शिपयार्डने देशातच सुमारे ३४ वेल्डिंग तंत्रज्ञान विकसित केले. त्यात विशेषत्वाने मिश्रा धातू मंडळ लिमिटेडने तयार केलेल्या वेल्डिंग रॉडचा वापर केला. त्यासाठी ५०० वेल्डरना विशेषत्वाने प्रशिक्षित करण्यात आले. त्यांनी विशेष पोलाद कापणे आणि ते वेल्ड करण्याचे तंत्रज्ञान बनवले.

छत्रपती शिवाजी महाराज यांना नवा ध्वज समर्पित पंतप्रधानांनीनौदलाच्या नव्या ध्वजाचे अनावरण केले. सेंट जॉर्ज क्रॉस हटवून डावीकडे तिरंगा आहे. बाजूला अष्टकोनी निळ्या बॅकग्राउंडवर सोन्याच्या रंगात प्रतीक चिन्ह आहे. हा आकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शाही मोहोरवरून घेतला आहे.

२० विमाने उभी राहू शकतील, २००० नौसैनिक तैनात, त्यात २५ महिला विक्रांत विशाल आहे, विराट आहे, विहंगम आहे. त्याची क्षमता फुटबॉलच्या दोन मैदानांएवढी आहे. त्यात एवढे केबल आहे की, कोची ते काशीपर्यंत अंथरले जाऊ शकते.’ - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

बातम्या आणखी आहेत...