आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 20 Thousand People In The Shipyard; But Because Of Lack Of Information, Stay Away From Voting | Marathi News

गुजरातच्या अलंगहून ग्राउंड रिपोर्ट:शिपयार्डमध्ये 20 हजार लोक; पण माहिती नसल्याने मतदानापासून दूर

अलंग / गाैरव तिवारी5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातमध्ये समुद्रमालेतील किनारपट्टीवरील आेबडधाेबड मार्गाने जहाजांच्या सर्वात माेठ्या कब्रस्तानमध्ये पाेहाेचलाे. येथे जगभरातील निवृत्त जहाजांचे तोडकाम केले जाते. या शिपयार्डमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या २० हजारावर आहे. शिपयार्डजवळ एका रुग्णालयासमाेर लांब रांग दिसून येते. येथे लाेक पिण्याचे पाणी मिळावे यासाठी रांगेत उभे हाेते. या रांगेत उत्तर प्रदेशच्या मीनाकुमारीही हाेत्या. त्या तीन वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथून आल्या आहेत.

त्या म्हणाल्या, रेड क्राॅसने रुग्णालयाजवळ बाेअरवेलची सुविधा निर्माण केली. हाच आमच्यासाठी पाण्याचा एकमेव स्रोत आहे. सुमारे दाेन लाख लाेकसंख्येच्या परिसरातील हे एकमेव रुग्णालय आहे. शिप ब्रेकिंग यार्डमध्ये पक्की घरे, शाैचालय यांचा अभाव आहे. गुजरातच्या मेरीटाइम बाेर्डाने काही घरे बांधली हाेती. अशा ठिकाणी केवळ पुरुष राहू शकतात, अशी त्यांची अट हाेती. त्यामुळे खाेलीएेवजी हाॅलमध्ये त्यांना मुक्काम करावा लागला. एका हाॅलमध्ये ८ जणांना राहावे लागले. त्यांना ये-जा करण्याची सुविधा नाही. म्हणूनच ९० टक्के हाॅल रिकामे आहेत.

मतदारांशी संपर्क करणार : जिल्हाधिकारी
भावनगरचे जिल्हाधिकारी डी.के. पारेख म्हणाले, आगामी काळात अलंग शिपयार्डमध्ये बीएलओ घराेघर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेऊ. जीएमबी व स्थानिक असाेसिएशनही मतदानाच्या दिवशी शिपयार्डच्या दिवशी लाेकांना सुट्टी देईल. ती पगारी मानली जाईल. अलंगमध्ये ८ मतदान केंद्रे आहेत.

बातम्या आणखी आहेत...