आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • 200 Doctors Treating Corona Patients Have Died So Far; Ask Prime Minister Modi For Help From Doctors

योद्धे संकटात:कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या 200 डॉक्टरांचा आतापर्यंत मृत्यू; पंतप्रधान मोदी यांना डॉक्टरांचे मदतीसाठी साकडे

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • सर्वाधिक 43 डॉक्टरांचा तामिळनाडूत मृत्यू, मृतांत 32 डॉक्टरांचे वय 50 वर्षांहून कमी
 • सात राज्यांतील 129 डॉक्टरांचे प्राण गेले

देशात कोरोना रुग्णांच्या उपचारात रात्रंदिवस झटणाऱ्या २०० डॉक्टरांना संसर्गामुळे प्राणास मुकावे लागले आहे. त्यापैकी ६२ जनरल प्रॅक्टिशनर्स आहेत. २३ मेडिसिन डॉक्टर आहेत. कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर रुग्ण सामान्यपणे जनरल प्रॅक्टिशनर किंवा मेडिसिन डॉक्टरकडे धाव घेतात. आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजन शर्मा म्हणाले, रुग्णांची तपासणी पहिल्यांदा हे डॉक्टर करतात. त्यामुळे त्यांना संसर्गाचा धोका जास्त मोठा आहे. त्याशिवाय अॅनेस्थेशिया, दंत व इतर काही विभागांतील डॉक्टरांचाही मृतांमध्ये समावेश आहे. तामिळनाडूत सर्वाधिक ४३ डॉक्टरांचा संसर्गामुळे मृत्यू झाला. आधीपासून काहीही आजार नसलेले त्यात तीन डॉक्टर होते. ३२ डॉक्टरांचे वय ५० वर्षे किंवा कमी आहे. मृत डॉक्टरांत २७ ते ७० वर्षे वयाच्याही डॉक्टरांचा समावेश होता. आयएमएने पंतप्रधान मोदी यांना याबाबत चिंता व्यक्त करणारे पत्र पाठवले. डॉक्टरांच्या आजारी नातेवाइकांनादेखील खाटा नाहीत. डॉक्टर तसेच नातेवाइकांनादेखील विम्याची सुविधा मिळायला हवी, अशी मागणी त्यातून करण्यात आली आहे.

सतर्कता : केरळ वगळता उर्वरित ठिकाणी बेपर्वाई

दिल्ली एम्सचे माजी संचालक डॉ. एम.सी. मिश्रा म्हणाले, ताप व कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण सर्वात आधी जनरल प्रॅक्टिशनरकडे जातात. अनेक डॉक्टरही बेपर्वाई दाखवतात. पीपीई किट वापरत नाहीत. मास्कदेखील याेग्य प्रकारे वापरत नाहीत. फिजिकल डिस्टन्सिंगचेदेखील योग्य पालन करत नाहीत. केरळमध्ये सर्वात आधी रुग्ण आढळला होता. त्यानंतर येथील डॉक्टरांनी आजाराचे गांभीर्य लक्षात घेतले. डॉक्टर असो की इतर स्टाफ - या सर्वांना पीपीई किट अनिवार्य आहे.

वाद : तामिळनाडू सरकारला मृतांच्या आकड्यावर नाही विश्वास

आयएमए ज्युनियर विंगचे अध्यक्ष डॉ. अबुल हसन म्हणाले, सुरुवातीला सोशल डिस्टन्सिंग पाळले गेले नाही. पीपीई किटची गुणवत्ता खराब होती. एवढेच नव्हे तर ताप नसलेल्या रुग्णांना स्वतंत्र ठेवण्यात आलेले नाही. त्याचा फटका डॉक्टरांना बसला आहे. तामिळनाडू सरकारने येथे ४३ डॉक्टरांच्या मृत्यूचा दावा स्वीकारला नाही. सरकारने आकड्याबाबतचे पुरावे मागितले आहेत. त्यासाठी आता डॉक्टरांच्या मृत्यूची कारणे सांगणारी प्रमाणपत्रे एकत्र करून सरकारला देण्याची तयारी सुरू आहे.

राज्य मृत्यू

 • महाराष्ट्र 23
 • बिहार 19
 • गुजरात 23
 • दिल्ली 12
 • मध्य प्रदेश 6
 • तामिळनाडू 43
 • हरियाणा 3
बातम्या आणखी आहेत...