आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 2000 Thousand Tractors Arrived At Tikri, Singhu And Ghazipur Borders; Police Started Removing Barricades, Allowing Only Three People On A Tractor

26 जानेवारीची ट्रॅक्टर परेड:टीकरी, सिंघु आणि गाजीपूर बॉर्डरवर 20 हजार ट्रॅक्टर पोहोचले; बॅरिकेड हटवले जात आहेत, एका ट्रॅक्टरवर तीन लोकांनाच परवानगी

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • किसान सोशल आर्मीचे 1000 स्वयंसेवकही तैनात असतील

शेतकरी संघटना आणि दिल्ली पोलिसांमध्ये 26 जानेवारीची ट्रॅक्टर रॅलीवर सहमती झाल्यानंतर सिंघु आणि टीकरी बॉर्डवर जोरदार तयारी सुरू झाली आहे. पंजाब आणि हरियाणावरुन ट्रॅक्टर येत आहेत. सूत्रांनुसार रविवारच्या रात्रीपर्यंत टीकरी, सिंघु आणि गाजीपूर बॉर्डरवर जवळपास 20 हजार ट्रॅक्टर पोहोचले आहेत. शेतकरी नेत्यांचा दावा आहे की, 26 जानेवारीच्या सकाळपर्यंत एक लाख ट्रॅक्टर येतील.

टीकरी बॉर्डरवर एका साइडने रस्ता उघडण्यात आला
रविवाररच्या संध्याकाळी रुटवर सहमती झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी टीकरी बॉर्डरपासून दिल्लीकडे येणाऱ्या रस्त्यावरील एका साडइने बॅरिकेडिंग हटवली आहे. आंदोलनाच्या स्थळावर जवळपास एक किलोमीटर पुढे सीमेंटचे बॅरिकेड्स आणि लोखंडाचे मोठे कंटेनर हटवून रस्ता रिकामा करण्यात आला आहे. यासोबतच ठरलेल्या रुटवर दिल्ली पोलिस आणि CRPF च्या जवानांनीही सुरक्षा व्यवस्था सांभाळली आहे. परेडमध्ये सर्वात जास्त ट्रॅक्टर टीकरी बॉर्डरवरुन दिल्लीत येतील. यामुळे येथे कडेकोट बंदोबस्त असणारर आहे. पोलिसांनी अट ठेवली आहे की, एका ट्रॅक्टरवर तीनपेक्षा जास्त लोकांनी बसू नये. दुसऱ्या गोष्टी ठरवण्यासाठी शेतकरी संघटना आणि पोलिस सोमवारीही बातचित करतील.

मार्केट बंद राहणार, रस्तेही रिकामे होणार
टीकरीवरुन दिल्लीच्या मार्गावर 26 जानेवारीला ट्रॅक्टर रॅलीदरम्यान सुरक्षादल आणि शेतकऱ्यांव्यतिरिक्त कुणीही असणार नाही. एका पोलिस अधिकाऱ्यानुसार 25 जानेवारीच्या संध्याकाळी सर्व दुकाने बंद केल्या जाऊ शकतात. कारण, काही गडबड झाली तरीही वाहन आणि दुकानांना नुकसान पोहोचणार नाही. टीकरी बॉर्डरच्या जवळपास येथे शेतकरी जमा झाले आहेत, तो रहिवासी परिसर आहे. यामुळे येथे कडेकोट सुरक्षेचा बंदोबस्त केला जाईल. परेडच्या नियोजित मार्गाबरोबरच आजूबाजूच्या रस्त्यांवरही डायव्हर्शन योजना तयार करण्यात आल्या आहेत.

किसान सोशल आर्मीचे 1000 स्वयंसेवकही तैनात असतील
टीकरी बॉर्डरहून दिल्लीकडे येणार्‍या ट्रॅक्टर परेडसाठी फार्मर्स सोशल आर्मीचे एक हजार स्वयंसेवकही तैनात केले जातील. ही यादी पोलिसांनाही दिली जाईल. या स्वयंसेवकांचे नेतृत्व करणारे अजित सिंह म्हणाले, 'स्वयंसेवक ड्रेस कोडमध्ये असतील. त्यापैकी प्रथमोपचार, पाणी आणि चहा पुरवण्याशिवाय ट्रॅक्टर मेकॅनिक देखील असतील. यासाठी आम्ही त्यांना प्रशिक्षणही देत ​​आहोत.

बातम्या आणखी आहेत...