आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 20,000 People Gathered At The Funeral Of A Muslim Cleric; Police Filed A Crime After The Video Went Viral

कोविड प्रोटोकॉलचाच 'अंत्यविधी':मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेत जमले 20 हजार लोक; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दाखल केला गुन्हा

बदायूंएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • यावेळी कब्रस्तानमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती, गर्दीसमोर पोलिसही हतबल दिसले

उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात जिला-ए-काजी हजरत अब्दुल हमीद मोहम्मद सालिमुल कादरी यांच्या अंत्य यात्रेत 15-20 हजार लोकांची गर्दी जमल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी सर्वांनाच कोरोना नियमांचा विसर पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. या गर्दीमध्ये अनेकांनी तोंडावर मास्कदेखील लावला नव्हता. या संपूर्ण प्रकारादरम्यान पोलिसही हतबल दिसले. सोमवारी रात्री पोलिसांनी अज्ञातांविरोधात एपआयआर दाखल केली.

जिवंत असताना धर्मगुरू द्यायचे नियमांचे पालन करण्याची शिकवण

मौलवी टोलामध्ये मुस्लिम धर्मगुरु हजरत शेख अब्दुल हमीद मुहम्मद सालिमुल कादरी बदायूंनी यांचे रविवारी निधन झाले. त्यांचा मुस्लिमांसह हिंदूदेखील आदर करायचे. त्यांनी अनेक प्रकरणात सरकारला पाठींबा दिला होता. मग नागरिकत्व कायदा असो किंवा कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करणे असो. ते स्वतः लोकांना कोरोना नियमांचे पालन करण्यास सांगायचे. पण, त्यांच्या शिकवणीचा त्यांच्याच अनुयायांना विसर पडल्याचे दिसले.

गर्दीसमोर पोलिसही हतबल

दुपारी त्यांच्या निधनाची बातमी पसरताच त्यांचे अनुयायी मोठ्या संख्येने जमले. पाहता-पाहता त्यांच्या अंत्ययात्रेत 15-20 हजार लोक जमा झाले. यावेळी धर्मगुरुंच्या अनुयायांमध्ये कोरोनाची भीती दिसत नव्हती. कुणीच कोरोना नियमांचे पालन केले नाही. या एवढ्या मोठ्या गर्दीसमोर पोलिसही हतबदल दिसू लागले.

घटनेनंतर पोलिस अॅक्शन मोडमध्ये
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बदायूं पोलिस अॅक्शनमध्ये आले आणि महामारी कायद्यानुसार, कलम-188, 269 आणि 270 अंतर्गत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...