आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 21 ITBP Troopers, Who Faced China 6 Times In Eastern Ladakh In May June, Awarded Gallantry Medals

लडाखमध्ये आयटीबीपीचे शौर्य:मे-जून महिन्यात 6 वेळा ईस्टर्न लडाखमध्ये चीनचा सामना करणाऱ्या आयटीबीपीच्या 21 जवानांना गॅलेंट्री मेडल

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: उपमिता वाजपेयी
  • कॉपी लिंक
  • हिमालयाच्या ऊंच शिखरांवर आयटीबीपीचे जवान ड्यूटी करतात, 24 ऑक्टोबर 1962 ला याची स्थापना झाली

आयटीबीपीने मे आणि जून महिन्यात 5-6 वेळा लडाखच्या विविध भागात चीनचा सामना करणाऱ्या आयटीबीपीच्या 21 अधिकारी आणि जवानांना गॅलेंट्री मेडल देण्याची घोषणा केली आहे. आज(14 ऑगस्ट) आयटीबीपीचे डीजी सुरजीत सिंह देसवाल यांनी याबाबत घोषणा केली.

आयटीबीपीने सांगितल्यानुसार, त्यांच्या जवानांनी पूर्व लडाखमध्ये चीनसोबत झालेल्या हिंसक चकमकीदरम्यान फक्त स्वतःचा बचाव केला नाही, तर चीनी सैनिकांची संख्या जास्त असूनही त्यांना सामना केला. यासोबतच त्यांनी आर्मीसोबत मिळून चकमकीत जखमी झालेल्या जवानांना सुरक्षित ठिकाणी नेले.

हिमालयाच्या ऊंच शिखरांवर आयटीबीपीचे जवान ड्यूटी करतात, 24 ऑक्टोबर 1962 ला याची स्थापना झाली होती.

आतापर्यंत फक्त भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये गलवान घाटीत झालेल्या चकमकीची माहिती समोर आली, पण यापूर्वी आयटीबीपी आणि चीनी सैनिक अनेकवेळा मारामारी आणि दगडफेक झाली. अनेकवेळा ही चकमक 17-18 तास चालली. यादरम्यान काही वेळा चीनी सैनिक तर काही वेळा आयटीबीपीचे सैनिक जखमी झाले.

डीजी आयटीबीपीने 294 जवानांना ईस्टर्न लडाखमध्ये चीनी सैनिकांचा मोठ्या हिमतीने सामना केल्याबद्दल डीजी प्रशंसा पत्र आणि पदक दिले

आयटीबीपी 3,488 किमी लांब असलेल्या चीनी सीमेवर फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस आहे. प्रत्येक ठिकाणी आयटीबीपीचे पोस्ट आहे आणि फोर्स पेट्रोलिंगद्वारे हाय अल्टीट्यूड असलेल्या या भागांची सुरक्षा करते. गॅलेंट्री मेडलची घोषणा ज्या सैनिकांसाठी झाली आहे, त्यांनी पँगॉन्ग लेक पासून गलवान आणि हॉट स्प्रिंगदरम्यान ईस्टर्न लडाखच्या अनेक भागात चीनी सैनिकांचा सामना केला आहे. तसेच, मागील दोन महिन्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये कमीत-कतमी सहा वेळेस दगडफेक आणि मारामारी झाली आहे. परंतू, ही माहिती गोपनीय असल्यामुळे कधी समोर आली नाही.

आयटीबीपीच्या 294 जवानांना स्वातंत्र्य दिनापूर्वी डीजी प्रशंसा पत्र देण्यात आले. त्यानंतर चीनी आणि भारतीय सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकींची माहिती उघड करण्यात आली. आयटीबीपीने सांगितल्यानुसार, आयटीबीपीने त्या 21 जवानांना शौर्य पदकासाठी निवडले आहे, ज्यांनी मे आणि जून, 2020 महीन्यात ईस्टर्न लडाखमध्ये चीनी सैनिकांचा सामना केला.

बातम्या आणखी आहेत...