आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 21 People Died Due To Alcohol In Chhapra District, 18 Were Injured; Chances Of Poisoning Due To Fake Alcohol

बिहार:​​​​​​​छपरा जिल्ह्यात दारूमुळे 21 जणांचा मृत्यू, 18 अत्यवस्थ ; बनावट दारूमुळे विषबाधेची शक्यता

छपरा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारच्या छपरा जिल्ह्यात अवैध अड्ड्यावरील दारू पिऊन २१ जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या नातेवाइकांनी सांगितले की, दारू पिऊन घरी आल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. काही जणांचा घरी, तर काहींचा दवाखान्यात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर लोकांनी निदर्शने केली. दारूविक्रीप्रकरणी पिता-पुत्राला अटक करण्यात आली आहे. छपराचे एसपी म्हणाले की, मृत्यूचे कारण संशयास्पद आहे. बनावट दारूमुळे विषबाधा होऊन मृत्यूची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे संसद आणि बिहार विधानसभेतही हा मुद्दा गाजला. विधानसभेत, भाजपने या मृत्यूसाठी मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरले आणि सभागृहाच्या आत आणि बाहेर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

बातम्या आणखी आहेत...