आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 21 year old Activist Arrested From Bangalore, Accused Of Editing Toolkit In Support Of Farmers' Movement

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रेटा थनबर्ग प्रकरणात पहिली अटक:बंगळुरुतून 21 वर्षीय युवतीला अटक, शेतकरी आंदोलनाचे समर्थन करणारे टूलकिट एडिट केल्याचा आरोप

बंगळुरू22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्विटरने डिलीट केले होते ग्रेटाचे ट्वीट्स

दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने शनिवारी बंगळुरुतून एका 21 वर्षीय क्लायमेट अॅक्टिव्हिस्टला अटक केली आहे. दिशा रवी असे तिचे नाव असून, ती फ्रायडे फॉर फ्यूचर कॅम्पेनच्या संस्थापकांपैकी एक आहे. दिशावर शेतकरी आंदोलनाशी संबंधित एक टुलकिट एडिट केल्याचा आरोप आहे.

हे टूलकिट तेव्हा चर्चेत आले होते, जेव्हा स्वीडनची पर्यावरण बदल कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गने याला आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते. ग्रेटाने टूलकिट शेअर करण्यासोबतच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. 4 फेब्रुवारीला दिल्ली पोलिसांनी टूलकिटबाबत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

ट्विटरने डिलीट केले होते ग्रेटाचे ट्वीट्स

ग्रेटाने 3 फेब्रुवारीला ट्वीट करुन शेतकरी आंदोलानाला पाठिंबा दिला होता. तिने यात एक टूलकिट शेअर केली होती. यात 26 जानेवारीला दिल्लीमध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनाची माहिती होती. यानंतर ट्विटरने ग्रेटाचे ते ट्विट्स डिलीट केले होते.

यानंतर बातम्या आल्या होत्या की, दिल्ली पोलिसांनी ग्रेटाविरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी स्पष्ट केले की, एफआयआरमध्ये कोणत्याची ठराविक व्यक्तीचे नाव लिहीले नाही.

बातम्या आणखी आहेत...