आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोर्टिस रुग्णालयात बलात्कार:व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या तरुणीवर बलात्कार, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन संशयित ताब्यात

गुडगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुडगांवच्या फोर्टिस रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असलेल्या तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 22 ते 27 ऑक्टोबरदरम्यान तिच्यावर बलात्कार झाला. पीडितेला शुद्ध आल्यानंतर 28 ऑक्टोबरला तिने आपल्या वडिलांना आपबीती सांगितली. आरोपीचे नाव विकास आहे. या गुन्ह्यात आरोपीची हॉस्पीटलमधील कर्मचाऱ्याने मदत केल्याचा संशय आहे. CCTV फुटेजच्या आधारे 2 संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे.

पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे तरुणीला 21 ऑक्टोबरला गुडगावमधील फोर्टिस रुग्णालयात भरती केले होते. तब्येत बिघडल्यावर 22 ऑक्टोबरला तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. हॉस्पीटलमध्ये तिच्या बेशुद्ध अवस्थेचा फायदा घेऊन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 29 ऑक्टोबरला गुन्ह्याची नोंद केली. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे.