आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पश्चिम बंगाल:पतीच्या मृत्यूनंतर 21 वर्षांनी महिलेला ‘अनुकंपा’ नोकरी; प. बंगालच्या कंपनीला 2 लाखांचा दंड ठोठावला

पवन कुमार | नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चोरांच्या हल्ल्यात झाला होता गार्डचा मृत्यू

पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळवण्यासाठी २१ वर्षांपासून कायदेशीर लढाई लढणाऱ्या महिलेला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने पश्चिम बंगालमधील कंपनी भारत कोकिंग कोल लिमिटेड (बीसीसीएल) ला आदेश दिले की, महिला किंवा तिच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला एक महिन्याच्या आत नोकरी द्यावी. न्यायालयाने कंपनीला दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. ही रक्कम पीडित कुटुंबाला भरपाई म्हणून देण्यात येईल.

न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, इंदू मल्होत्रा आणि के. एम. जोसेफ यांच्या पीठाने १९ जुलैला दिलेल्या निकालात कलकत्ता उच्च न्यायालयाचे आदेश कायम ठेवले. उच्च न्यायालयाने महिलेला अनुकंपा तत्त्वावर तत्काळ नोकरी देण्याचे आदेश दिले होते.

चोरांच्या हल्ल्यात झाला होता गार्डचा मृत्यू

भारत कोकिंग कोलमध्ये ३ जुलै १९९९ रोजी काही चोर घुसले होते. गार्डने हटकल्यानंतर ते पळाले. गार्डही पाठलाग केला. त्यानंतर तो परतलाच नाही. पुरुलिया पोलिसांनी म्हटले होते की, गुन्हेगारांनी गार्डची हत्या करून मृतदेह नदीत फेकला. त्या आधारावर गार्डची पत्नी रुदादेवी हिने नोकरीची मागणी केली होती.