आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 215 Crore Worth Of Illicit Liquor Seized In Gujarat In Last Two Years; News And Live Updates

दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये बिनधास्त तस्करी:​​​​​​​गुजरातमध्ये गेल्या दोन वर्षांत 215 कोटींची बेकायदा दारू जप्त; विषारी दारू पिऊन अलिगड येथे 46 जणांचा मृत्यू

अलिगड/ अंजार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कच्छमध्ये (गुजरात) 1.5 कोटी रुपयांचा मद्यसाठा नष्ट करण्यात आला

उत्तर प्रदेशातल्या अलिगडमध्ये सरकारी दुकानात खरेदी केलेले मद्य पिऊन १३ जणांचा मृत्यू झाला असून १० जणांची प्रकृती गंभीर अाहे. दुसरीकडे संपूर्ण दारूबंदी असलेल्या गुजरात राज्यातील कच्छमध्ये पाेलिसांनी दीड काेटी रुपये किमतीची बेकायदा दारू नष्ट केली. राज्यात गेल्या दाेन वर्षांत २१५ काेटी रुपयांची बेकायदा दारू जप्त करून नष्ट करण्यात अाली अाहे.

अलिगडचे डीएम चंद्रभूषण सिंह यांनी ११ लाेकांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केलेले असले तरी करसुअा गावातील लाेकांनी १३ जणांचा यात मृत्यू झाल्याचा दावा केला अाहे. या प्रकरणाने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी दारूच्या दुकानासमाेर अांदाेलनही केले. दुसरीकडे गुजरातच्या अंजारमध्ये अाॅक्टाेबर २०२० पासून मे २०२१ या काळात विक्रमी १.३० काेटी रुपयांची दारू पकडली. कायदेशीर प्रक्रियेनंतर जप्त करण्यात अालेला हा दारूचा साठा ट्रेलरमध्ये भरून खुल्या जागेत नष्ट करण्यात अाला. या सर्व प्रक्रियेसाठी १५ तास लागले.

गुजरातमध्ये संपूर्ण दारूबंदी असल्याने लपूनछपून तस्करीच्या माध्यमातून राज्यात दारूची विक्री केली जाते. राज्यात फक्त ६५ परवानाधारक मद्य दुकाने असून येथे परवान्याच्या माध्यमातून मद्यविक्रीसाठी कंत्राटे दिली जातात. अंजार पाेलिस ठाण्याचे निरीक्षक एम.एन. राणा म्हणाले, न्यायालयाच्या अादेशानुसार ७५० मिलीच्या बेकायदा ३२,७३३ मद्याच्या बाटल्या नष्ट करण्यात अाल्या. याशिवाय बिअरच्या ८,९०४ बाटल्याही नष्ट करण्यात अाल्या.

बिहारमध्ये दारूबंदीपासून एकूण ९४.९ लाख लिटर विदेशी मद्य जप्त
गुजरातनंतर बिहार या दारूबंदी असलेल्या अन्य एका राज्यात एप्रिल २०१६ पासून ते जानेवारी २०२१ पर्यंत अातापर्यंत ५१.७ लाख लिटर देशी मद्य, ९४.९ लाख लिटर विदेशी मद्य जप्त करण्यात अाले. याप्रकरणी ३ लाख ३९ हजार ४०१ अाराेपींना अटक करण्यात अाली. यामध्ये ४७० अाराेपींना न्यायालयाने शिक्षा दिली अाहे. दारूबंदी माेहिमेत बेजबाबदार वर्तणूक करणारे पाेलिस अाणि उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर खातेनिहाय कारवाई करण्यात अाली असून ३४८ लाेकांच्या विराेधात एफअायअार नाेंद करण्यात अाला अाहे. याशिवाय १८६ लाेकांना बडतर्फ अाणि ६० पाेलिस अधिकाऱ्यांना पदावरून हटवण्यात अाले अाहे.

बातम्या आणखी आहेत...