आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 22 Year Old Youth Consumed Poison In Rampura Phool Of Bathinda, Gurlabh Singh Returned From Delhi Front

शेतकरी आंदोलनात अजून एक आत्महत्या:बठिंडामधील 22 वर्षीय शेतकऱ्याने घेतले विष, दोन दिवसांपूर्वीच दिल्ली आंदोलनातून घरी परतला होता

बठिंडा7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 16 डिसेंबरला संत राम सिंग यांनी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ गोळी झाडून आत्महत्या केली होती
  • 25 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आतापर्यंत 20 पेक्षा जास्त आंदोलकांचा मृत्यू झाले आहेत

मागील 25 दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान अजून एक आत्महत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. बठिंडामध्ये 22 वर्षीय शेतकरी तरुण गुरलाभ सिंगने रविवारी आत्महत्या केली आङे. तो दोन दिवसांपूर्वीच दिल्लीतील आंदोलनावरुन घरी परतला होता. यापूर्वी, 16 डिसेंबरला 65 वर्षीय संत बाबा राम सिंग यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती.

बठिंडातील रामपुरा फूलच्या दयालपुरामध्ये राहणारा गुरलाभ 18 डिसेंबरलाच आंदोलनावरुन परत आला होता. त्याने रविवारी विषारी गोळ्या खाऊन आत्महत्या केली. तपासात समोर आले आहे की, गुरलाभ अल्पभूधारक शेतकरी असून, त्याच्यावर सहा लाखांचे कर्ज होते.

संत राम सिंह यांनी शेतकरी आंदोलनादरम्यान केली आत्महत्या

कृषी कायद्याविरोधात आंदोलनाच्या समर्थनार्थ 65 वर्षीय संत बाबा राम सिंह यांनी आत्महत्या केली आहे. ते करनालच्या सिंघरा गावातील रहिवासी होते. तसेच, ते सिंघराच्या गुरुद्वारा साहिब नानकसरचे ग्रंथी होते. त्यांच्या अनुयायांची संख्या लाखोंमध्ये आहे.

संत राम सिंह यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. त्यांच्या सोबत असलेल्या गुरमीत यांनी सांगितले की, राम सिंह यांनी आम्हाला म्हटले की, तुम्ही स्टेजवर जाऊन अरदास करा. मी स्टेजवर गेलो, तेव्हा त्यांनी स्वतःवर गोळी झाडली. आत्महत्येपूर्वी त्यांनी पंजाबी भाषेत एक सुसाइड नोट लिहीली आहे. यात त्यांनी लिहीले की, 'आत्याचाराविरोधात हा आवाज आहे.' दिल्ली सिख गुरुद्वारा प्रबंध कमेटीचे अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा यांनी त्यांच्या आत्महत्येवर दुःख व्यक्त केले आहे.

आंदोलनादरम्यान आतापर्यंत 20 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा मृत्यू

कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली बॉर्डरवर मागील 25 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आतापर्यंत वेगवेगळ्या कारणामुळे 20 पेक्षा जास्त आंदोलकांचा मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...