आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 226% Increase In Clean Energy In 5 Years, Can Halve Electricity Bill In Ten Years

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पर्यावरणाबाबत सुखद वार्ता:5 वर्षांत स्वच्छ ऊर्जेत 226% वाढ, दहा वर्षांत निम्मे होऊ शकते वीज बिल

नवी दिल्ली |प्रमोदकुमारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वातावरण बदलात चांगली कामगिरी करणाऱ्या दहा देशांत भारताचा समावेश, जाणून घ्या याविषयी

हवामान बदल कामगिरी निर्देशांक २०२० नुसार भारत चांगली कामगिरी करणाऱ्या अव्वल दहा देशांत आहे. हे देश गैरजीवाश्म इंधनातून वीज उत्पादन आणि कार्बन उत्सर्जनात घट करण्यासाठी चांगले काम करत आहेत. देशात अक्षय ऊर्जेची क्षमता ५ वर्षांत २२६% वाढली आहे. यातून ८९ गीगावॅट वीज उपलब्ध होत आहे. अक्षय ऊर्जा ४५० गीगावॅट करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. २०१४ ते २०२० दरम्यान सौरऊर्जाही १३ पट वाढली आहे. वातावरण तज्ञ आरती खोसला सांगतात की, गेल्या ५ वर्षांत हवामान निर्देशांक सुधारण्यावर खूप काम झाले आहे. एनटीपीसीचे ३२ हजार मेगावॅटच्या सौर योजनेवर काम सुरू आहे. टाटा पॉवरही नव्या कोळसा प्रकल्पात गुंतवणूक करत नाही. सौर प्रकल्पाची वीज जवळपास २ रु. प्रतियुनिट दराने मिळते, औष्णिक शक्ती प्रकल्पाच्या विजेची किंमत ४ रु. असते. येत्या दहा वर्षांत विजेचे बिल सुमारे ५०% पर्यंत कमी होऊ शकते.अदानी-अंबानीसारखे समूहही गो ग्रीनवर काम करताहेत.

५ पॉइंट रूल : वेळेआधी लक्ष्यप्राप्ती केली, हिरवळ वाढवली, कोळशाचा वापर घटला
हवामान : स्वच्छ ऊर्जेवर खर्च वाढवला

हवामान बदलावर सरकार १७० अब्ज डॉलर दरवर्षी खर्च करणार आहे. ही रक्कम २०३० पर्यंत दिली जाईल. २०१६ ते २०१८ दरम्यान दरवर्षी १९ अब्ज डॉलर खर्च झाले. या खर्चातून जीडीपीत कार्बन उत्सर्जनात ७% घट झाली.

वाहतूक : ई-वाहने वाढताहेत, रेल्वेही साैर
हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनासाठी पहिल्या टप्प्यात ३५९ काेटींची सबसिडी दिली. आता दुसऱ्या टप्प्यात सरकार १० हजार काेटींची सबसिडी देत आहे. २०३० पर्यंत ३० % वाहतूक इलेक्ट्रिक करायची आहे. रेल्वेचादेखील २० हजार मेगावाॅटचा साैर क्षमता प्रकल्प तयार हाेत आहे.

नो न्यू कोल : कोळशापासून वीज ६७% घट
महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात सरकारांनी नव्या कोळसा प्रकल्पांवर बंदी घातली आहे. एनटीपीसी ,टाटा पाॅवरसारख्या कंपन्याही कोळसा वीज प्रकल्प बंद करतील. गेल्या एक वर्षात कोळशापासून वीज उत्पादनात ९.३%ची घट झाली आहे. २०२० पर्यंत कोळशापासून वीज उत्पादनात ६७% घट झाली आहे.

लो कार्बन : कार्बन उत्सर्जन घटण्यावर काम
देशात २०२२ पर्यंत सिंगल यूज प्लास्टिक संपुष्टात येईल. देशात १५ काेटी नवीन लाेकांकडे गॅस कनेक्शन असेल. सध्या ८ काेटी सिलिंडरचे लक्ष्य पूर्ण झाले आहे. पाेलाद आणि सिमेंटसारख्या कारख्यान्यांत २०५० पर्यंत कार्बन उत्सर्जन पूर्णत: बंद केले जाईल. त्यासाठी भारताने स्वीडनबराेबर भागीदारीतून ‘लाे कार्बन पाथ वे’ साठी ग्रुप तयार केला आहे.

अक्षय ऊर्जा : उद्दिष्टाच्या १०% जास्त
भारताने २०१९ मध्ये म्हटले होते की, २०२२ पर्यंत अक्षय ऊर्जेची क्षमता १७५ गीगावॅट करून घेईल. भारताने २०१९-२० मध्ये १०% जास्त उद्दिष्ट प्राप्त केले. सध्या भारताची अक्षय ऊर्जा क्षमता ८९ गीगावॅट आहे. यात दरवर्षी ३५ गीगावॅट क्षमता वाढवण्यात येईल. अशा प्रकारे २०३० पर्यंत ४५० गीगावॅटचे उद्दिष्ट प्राप्त केले जाईल.

ही दाेन कारणेदेखील
हवामान पूर्वअंदाज सुधारला

मान्सून माेहिमेअंतर्गत गेल्या एका दशकात मान्सूनपूर्व अंदाजाच्या पद्धतीत सुधारणा केली. हवामान खात्याने पूर,चक्रीवादळासाठी प्रारंभिक चेतावणी प्रणाली सुरू केली. ग्रामीण कृषी हवामान सेवा सुरू केली. यात २.२ काेटी शेतकऱ्यांना हवामानाची माहिती दिली जाते.

देशाच्या वन क्षेत्रात वाढ
राष्ट्रीय अनुकूलन निधीतून हवामान बदलाचे ३० प्रकल्प सुरू आहेत. देशाच्या वन क्षेत्रात गेल्या ६ वर्षांत १५ हजार वर्ग किलाेमीटर वाढ झाली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser