आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 24 Corona Patients Die Due To Lack Of Oxygen In Karnataka State; News And Live Updates

कर्नाटक:ऑक्सिजनअभावी 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू; मंत्री म्हणाले : 6 हजार लिटर साठा होता, सिलिंडर नव्हते

बंगळुरू/ नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्ह्यात ऑक्सिजनचा सहा हजार लिटरचा साठा होता. पण ऑक्सिजन सिलिंडरची गरज होती.

कर्नाटकच्या चामराजनगर जिल्हा रुग्णालयात मेडिकल ऑक्सिजनच्या पुरवठ्यात तुटवडा निर्माण झाल्याने २४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी २३ रुग्ण कोरोना संक्रमित होते. घटनेनंतर मृतांच्या नातेवाइकांनी रुग्णालयासमोर निदर्शने केली. जिल्ह्याचे प्रभारी मंत्री एस. सुरेश म्हणाले, ‘प्रशासनाकडून डेथ ऑडिट रिपोर्ट मागवला आहे. त्यावरून रुग्ण कोणत्या आजाराने पीडित होते, त्यांना कोणत्या राज्यातून आणले होते हे कळेल. सर्व मृत्यू मेडिकल ऑक्सिजनच्या पुरवठ्यातील तुटवड्यामुळे झाले असे म्हणणे योग्य नाही. हे मृत्यू रविवारी सकाळ ते सोमवार सकाळदरम्यान झाले. या २४ तासांपैकी पहिल्या २१ तासांत मेडिकल ऑक्सिजनचा तुटवडा नव्हता.

जिल्ह्यात ऑक्सिजनचा सहा हजार लिटरचा साठा होता. पण ऑक्सिजन सिलिंडरची गरज होती. सिलिंडर मैसुरू येथून येणार होते. पण बहुधा काहीतरी गडबड झाली. मी मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव, राज्याचे मुख्य सचिव आणि राज्यात ऑक्सिजन पुरवठ्याचे प्रभारी अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रताप रेड्डी यांना परिस्थितीची माहिती दिली आहे.’ दरम्यान, मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनीही जिल्ह्याच्या उपायुक्तांना बोलावून घटनेची माहिती घेतली.

बातम्या आणखी आहेत...