आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तर प्रदेश:औरैयामध्ये ट्रक अपघातात 24 मजुरांचा मृत्यू, सर्व मजूर राजस्थानमधून घरी निघाले होते

औरियाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बहुतांश मजूर बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील आहेत

उत्तर प्रदेशातील औरैया येथे शनिवारी पहाटे झालेल्या ट्रक अपघातामध्ये 24 मजुरांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व मजूर राजस्थानवरून येत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व मजूर चुना भरलेल्या एका ट्रकमधून प्रवास करत होते. चिरुहली गावाजवळ उभ्या असलेल्या एका ट्रकला हा ट्रक जाऊन धडकला आणि त्यानंतर दोन्ही ट्रक खड्ड्यात उलटले.

औरियाचे डीएम अभिषेक सिंह यांच्यानुसार, हा अपघात पहाटे 3.30 वाजता झाला. यामध्ये 24 लोकांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी आहेत. बहुतांश लोक बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील आहेत. अपघातातील एका जखमी मजुराने सांगितल्याप्रमाणे ट्रकमध्ये 40 मजूर होते.

बातम्या आणखी आहेत...