आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत 24 वर्षांपूर्वीच्या ‘मृताला’ अटक:पोलिसांना 24  वर्षे गुंगारा

नवी दिल्ली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाेरीच्या एका प्रकरणातील वाँटेड आराेपीला अटक करण्यात दिल्ली पाेलिसांना दाेन तपांनंतर यश आले आहे. धक्कादायक म्हणजे कागदावर हा आराेपी मृत घाेषित करण्यात आला हाेता. १९९१ मध्ये त्यास मृत घाेषित केले गेले. परंतु अलीकडेच बावाना पाेलिसांना त्याच्याबद्दलची गुप्त माहिती मिळाली हाेती. त्यानुसार दिल्ली पाेलिसांनी चक्रे फिरवली आणि त्याला जेरबंद केले. त्याला अटक केल्यानंतर दिल्ली पाेलिसांनी त्याच्याविराेधातील १९९१ च्या चाेरीच्या प्रकरणाची माहिती दिली. वास्तविक चाेरीचा हा खटला अजूनही न्यायालयात आहे. परंतु कागदाेपत्री मृत झाल्याचा अहवाल १९९८ मध्ये न्यायालयात दाखल केले हाेते. पाेलिस उपायुक्त दवेशकुमार माहला म्हणाले, त्याला बनावट कागदपत्रे कुणी तयार करू िदली याचा शाेध घेण्यात येत आहे. बनावट कागदपत्रे : सिटी पाेलिसांच्या म्हणण्यानुसार आराेपीने बनावट कागदपत्रे तयार केली आणि ताे दडून बसला. त्यानंतर ताे सुमारे २४ वर्षे पाेलिसांच्या हाती लागला नाही. शेवटी पाेलिसांनी आराेपी मृत झाला असावा असे स्वीकारले. त्यामुळेच काेर्टात ही फाइल पडून राहिली हाेती.

बातम्या आणखी आहेत...