आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 242 Out Of 273 Days Of Natural Calamities, 2,755 Dead, 18 Lakh Hectares Of Crops Destroyed, Highest Death Toll In Madhya Pradesh Himachal

देशात 273 पैकी 242 दिवस नैसर्गिक आपत्ती:2,755 जणांचा मृत्यू, 18 लाख हेक्टर पीक नष्ट; मध्य प्रदेश-हिमाचलमध्ये सर्वाधिक मृत्यू

अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

२०२२ या वर्षातील नऊ महिन्यांमध्ये देशात ८८% अत्यंत प्रतिकूल हवामान बदलांची नोंद झाली. म्हणजेच २७३ दिवसांपैकी २४२ दिवस देशाच्या काेणत्या न काेणत्या भागात उष्णतेची लाट, थंडीची लाट, चक्रीवादळ, वीज पडणे, अतिवृष्टी, भूस्खलन अशा आपत्तींचा सामना करावा लागला. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट अर्थात विज्ञान व पर्यावरण केंद्राच्या या पर्यावरणविषयक अहवालात हे निष्कर्ष समोर आले आहेत. या हवामानविषयक घटनांमध्ये २,७५५ जणांना जीव गमवावा लागल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. १८ लाख हेक्टरवरील पीक नष्ट झाले. ४,१६,६६७ कच्ची घरे उद्ध्वस्त झाली. २०२२ मध्ये, मध्य प्रदेशात सर्वात जास्त हवामान बदलाच्या घटनांची नोंद झाली होती, परंतु हिमाचलमध्ये सर्वाधिक ३५९ लोकांचा मृत्यू झाला.

मध्य प्रदेश आणि आसाम या दोन्ही राज्यांमध्ये प्रत्येकी ३०१ नागरिकांचा मृत्यू झाला. आसाममध्ये सर्वाधिक घरांची आणि जनावरांची हानी झाली. कर्नाटकात ८२ दिवस अत्यंत तीव्र हवामान बदलाच्या घटना घडल्या, तर देशभरातील ५०% पिके वातावरणातील या नैसर्गिक आपत्तींमुळे नष्ट झाली. मात्र, मध्य प्रदेशात पिकांच्या नुकसानीची कोणतीही आकडेवारी आढळून आली नाही. या घटनांमुळे झालेल्या नुकसानीचा योग्य अहवाल न मिळाल्याने हे घडले असावे, असे जाणकार सांगत आहेत.

तीव्र हवामान बदलाच्या घटनांचा सर्वाधिक फटका मध्य भारताला बसला: मध्य भारतात २७३ पैकी १९८ दिवस अत्यंत वेगवान हवामान बदल नाेंदविले गेले. त्यात ८८७ लोकांना आपला जीव गमवावा लागला, १.३६ लाख हेक्टरवरील पिके नष्ट झाली. २८ हजारांहून अधिक कच्च्या घरांचे नुकसान झाले. ७,५१९ जनावरांना जीव गमवावा लागला.

दररोज पाऊस-पूर, भूस्खलन {वीज पडणे : २७३ पैकी १५९ दिवस विजा पडल्या. त्यात ९५४ जणांनी जीव गमावला. मध्य प्रदेशात सर्वाधिक ४६ घटना घडल्या. त्यात १६४ मृत्यू, तर बिहारमध्ये २३ घटनांमध्ये २४३ मृत्यू झाले. जुलैमध्ये सर्व ३१ दिवस विजा पडल्या.

{उष्णतेची लाट : २७३ पैकी ६६ दिवस उष्णतेची लाट हाेती. त्यात ४५ मृत्यू झाले. राजस्थानमध्ये ४२, मध्य प्रदेशात ३८, हिमाचलमध्ये ३३, उत्तर प्रदेश व दिल्लीत २८ व महाराष्ट्रात २४ दिवस उष्णतेची लाट हाेती. त्यात ३४ जणांचा मृत्यू झाला आहे.

{जाेरदार पाऊस-पूर, भूस्खलन: २७३ पैकी १५७ दिवस अतिवृष्टी, पूर, भूस्खलन घडले. त्यात १२१४ मृत्यू झाले. मध्य प्रदेशात सर्वाधिक ७२ घटनांत ११२ जीव गेलेे. १ जून ते ३० सप्टेंबर या काळात अतिवृष्टी, पूर भूस्खलन राेजच घडले.

{थंडीची लाट : २७३ पैकी ३० दिवस थंडीची लाट होती. मध्य प्रदेशात सर्वाधिक २१, उत्तर प्रदेशात २०, पंजाबमध्ये १२, हरियाणामध्ये ११, राजस्थानमध्ये १० दिवस थंडीची लाट होती. जानेवारीत २२, फेब्रुवारीत ८ दिवस थंडीची लाट होती.

{ढगफुटीच्या घटना : २७३ पैकी ११ दिवस ढगफुटी झाली. जम्मू-काश्मीरमधील दोन घटनांमध्ये २०, तर हिमाचलच्या ७ घटनांमध्ये १२ जणांना जीव गमवावा लागला.

वातावरणातील अनियमिततेमुळे घरेलू उत्पन्नात २.८ टक्के घट विज्ञान आणि पर्यावरण केंद्राच्या महासंचालक सुनीता नारायण म्हणतात, जागतिक बँकेने असा अंदाज वर्तवला आहे की वाढते तापमान आणि असामान्य पाऊस यामुळे भारताचे सकल घरेलू उत्पन्न (जीडीपी) दरवर्षी २.८% कमी होत आहे. सुमारे ६० कोटी लोकसंख्येचे जीवनमानही घसरत आहे. याव्यतिरिक्त भारत सरकारचे स्वतःचे मूल्यांकन असे आहे की शेतकरी खरिपात ४.३% आणि रब्बीमध्ये ४.१% उत्पादनाचे नुकसान झाले आहे. यामुळे शेती उत्पन्नात अनुक्रमे १३.७% आणि ५.५% घट आहे. नारायण यांच्या मते, २०२२ मध्ये आपण आतापर्यंत जे पाहिले आहे ते तापमानवाढीच्या जगात एक नवीन अनियमितता आहे.

बातम्या आणखी आहेत...