आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 2441 Arrests In Assam So Far, Supervision Of Kaji Marriages For Maintaining Child Marriages

आसाममध्‍ये आतापर्यंत 2441 अटकेत:बालविवाह राेखण्यासाठी काजी विवाहांची देखरेख

सत्यनारायण मिश्रा|गुवाहाटीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आसाममध्ये आंदोलनादरम्यान बालविवाहाविरोधातील कारवाईला वेग आला आहे. सरकारने सांगितले की, याप्रकरणी ४०७४ गुन्हे दाखल करून २४४१ लोकांना अटक केली आहे. १४ वर्षांखालील मुलींशी लग्न करणाऱ्यांवर अजामीनपात्र कलमे लावली जातील. १४ ते १८ वर्षाच्या मुलीशी लग्न करणाऱ्या पुरुषांवर जामीनपात्र कलमे लावली जातील.बालविवाह रोखण्यासाठी काजी प्रणालीची देखरेख जिल्हा आयुक्तांद्वारे केली जाईल. अटकेतील लोकांना सोडवण्यासाठी त्यांचे कुटुंबीय ठाण्यात येत आहेत. दरम्यान,तृणमूल काँग्रेसने कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.

बालविवाह राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, आसाममध्ये माता व शिशू मृत्यूच्या जास्त दराचे कारण बालविवाह आहे. सर्वेक्षणात दिसले की, २० ते ४० वर्षे वयाच्या ३१% महिलांचे लग्न १८ वर्षांपेक्षा कमी वयात झाले हाेते.राष्ट्रीय सरासरी २३.३% आहे.

बातम्या आणखी आहेत...