आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाविकांचा मृत्यू:उत्तरकाशीत बस खोल दरीत कोसळून 25 भाविकांचा मृत्यू, 3 गंभीर; सर्व मृत मध्य प्रदेशातील रहिवासी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रीय महामार्गावर डामटाजवळ असे एक ठिकाण आहे, जे आजूबाजूकडून लक्षात येत नाही. या कारणामुळे कुणी काही पाहिले नाही. जखमी प्रवाशांचे किंचाळणेही कुणी ऐकणारे नव्हते. - Divya Marathi
राष्ट्रीय महामार्गावर डामटाजवळ असे एक ठिकाण आहे, जे आजूबाजूकडून लक्षात येत नाही. या कारणामुळे कुणी काही पाहिले नाही. जखमी प्रवाशांचे किंचाळणेही कुणी ऐकणारे नव्हते.

उत्तरकाशीत यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सायंकाळी ६ वाजता भीषण अपघात झाला. चारधाम यात्रेकरूंची बस डामटाजवळ खोल दरीत कोसळली. उत्तराखंड सरकारने सांगितले की, २३ प्रवाशांचा मृत्यू, तर ३ जण जखमी झाले. दोन बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू आहे.

सर्व भाविक मध्य प्रदेशच्या पन्नातील होते. त्यांनी रात्री हरिद्वारहून मिनी बस भाड्याने घेतली होती. डामटाजवळ ती अनियंत्रित होऊन दरीत कोसळली. बहुतांश प्रवाशांचा मृत्यू जागीच झाला. तीन लोकांनी रुग्णालयात प्राण सोडला. बचाव पथक पोहोचण्यापूर्वी स्थानिक नागरिकांनी बचाव कार्य सुरू केले. अंधारामुळे बचावात अडचणी आल्या. रात्री १० पर्यंत शोध सुरू होता. जि.प. सदस्य हाकमसिंह रावत म्हणाले, दोन जण अजून बेपत्ता आहेत.

राष्ट्रीय महामार्गावर डामटाजवळ असे एक ठिकाण आहे, जे आजूबाजूकडून लक्षात येत नाही. या कारणामुळे कुणी काही पाहिले नाही. जखमी प्रवाशांचे किंचाळणेही कुणी ऐकणारे नव्हते. जवळपास अर्ध्या तासानंतर एका वाहनात बसलेल्या यात्रेकरूंचे लक्ष दुर्घटनेच्या ठिकाणावर पडले. प्रवाशांनी गाडी थांबवली. रस्त्याच्या खाली पाहिले तेव्हा अपघाताची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. स्थानिक लोकांनी मृतदेह गोळा करण्यास सुरुवात केली. केवळ पाच जणांचा श्वासोच्छ्वास सुरू होता. रात्री १० वाजेपर्यंत १७ मृतदेह रस्त्यापर्यंत पोहोचवता आले होते. उर्वरित मृतदेह दरीतच होते. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी नियंत्रण कक्षात पोहोचले. ते रात्रीपर्यंत मदतकार्यावर लक्ष ठेवून होते.

बातम्या आणखी आहेत...